astrology

फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग आणि स्टीव जॉब्स देखील मानतात या मंदिराच्या चमत्काराला

नैनिताल जवळ कैंची मध्ये नीम करौली मातेचे प्रसिध्द मंदिर आहे आणि नीम करौल बाबाचा आश्रम आहे. या मंदिरावर लोकांची आस्था आहे. पण 2017 मध्ये ही जागा प्रसिद्धी झोतात आली जेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीच्या दौऱ्याच्या वेळेस या जागे बद्दल उल्लेख केला आणि आपण येथे आल्याचे सांगितले.

जुकरबर्ग याने मोदींना सांगितले की फेसबुक वाईट काळातून जात होता तेव्हा तो कसा भारतातील मंदिरात आला होता आणि तेथून प्रेरणा रुपी शक्ती घेऊन आज या स्थिती पर्यंत पोहचला. जुकरबर्गने सोबत हे पण सांगितले कि तो या मंदिरा मध्ये एप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब्सच्या सांगण्यावरून गेला होता.

चमत्कारी आहे हे मंदिर आणि नीम करौली बाबा

नैनीतालच्या भवाली-अल्मोड़ा हाई-वे वर असलेल्या कैंची धाम मंदिरा मध्ये दर वर्षी देश आणि विदेशातून लाखो लोक येतात. येथे हनुमान मंदिर आहे. आश्रमाचे नाव येथील पुजारी स्वर्गीय नीम करौली बाबा च्या नावावरून पडले आहे. बाबाच्या चमत्काराचे किस्से आजूबाजूच्या भागात ऐकण्यास मिळतात. असे सांगितले जाते कि ते स्वता गायब आणि प्रकट होऊ शकत असत. सोबतच त्यांना येणाऱ्या संकटा बद्दल पहिलेच माहिती असायची.

कोण होते नीम करौली बाबा

येथील लोक सांगतात कि नीम करौली बाबा दिव्य शक्ती असलेले संत होते. त्यांना हनुमानजीची सिद्धी मिळाली होती आणि ते त्रिकाळाचे दर्शन करू शकत होते. 1973 मध्ये त्यांचे निधन झाले. नीम करौली बाबा यांना पहिले पंडित नारायण या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या भक्तांमध्ये अनेक मोठे नेता देखील शामिल होते. जगभरातून अनेक विदेशी नागरिक देखील त्यांच्या आश्रमात येत असत. स्टीव जॉब्स आणि मार्क जूकरबर्ग सोबतच हॉलीवूडची टॉप एक्ट्रेस जूलिया रॉबर्ट्स देखील नीम करौली बाबाची भक्त होती.

सन्यास घेण्यासाठी आले होते स्टीव जॉब्स

स्टीव जॉब्स 1973 मध्ये सन्यास घेण्याच्या उद्देशाने येथे या मंदिरात बाबा कडे आले होते. त्यांच्या सोबत एक मित्र डैन कोटके सोबत होता. त्यांना नीम करौली बाबांना भेटायचे होते पण स्टीव येण्याच्या काही काळापूर्वी बाबांचे निधन झाले होते. येथे राहून काही दिवस स्टीव जॉब्सने ध्यान-आराधना केली. येथूनच स्टीवला प्रेरणा मिळाली कि सन्यास घेण्याच्या एवजी आपल्या देशात अमेरिकेत जाऊन नवीन कंपनी बनवली पाहिजे. येथून गेल्यानंतर स्टीवने एप्पल कंपनी बनवली. हि कंपनी टेक्नोलॉजीच्या जगातील मोठे नाव मानले जाते. स्टीव जॉब्स आयुष्यभर नीम करौली बाबाचे भक्त राहिले. असे बोलले जाते कैंसरने मृत्यू होण्याच्या वेळी देखील त्यांच्या उशाखाली बाबांचा फोटो ठेवलेला मिळाला होता.

जुकरबर्गला समस्यातून बाहेर काढले

2004 मध्ये मार्क जुकरबर्गची फेसबुक अत्यंत संकटातून जात होती आणि याच्या विक्रीची वेळ आली होती. चिंताग्रस्त जुकरबर्गने आपल्या गुरु स्टीव जॉब्सचा सल्ला मागितला. जुकरबर्गला आश्चर्य झाले कारण स्टीवने त्याला भारता मध्ये जाऊन काही दिवस या मंदिरात वेळ घालवण्याचा सल्ला दिला. जुकरबर्ग भारतामध्ये आले आणि या मंदिरातून त्यांना अशी शक्ती मिळाली ज्याने पुढे जाऊन त्यांनी पूर्ण जगास एका कुटुंबासारखे जवळ आणले.


Show More

Related Articles

Back to top button