Uncategorized

या गावामध्ये चालता-फिरता झोपून जातात लोक आणि अनेक आठवडे उठत नाहीत.. रहस्या समोर वैज्ञानिक हैरान

तसे तर झोपणे सर्वांना आवडते. काम आणि मेहनत केल्यानंतर जो थकवा येतो तो झोपल्यामुळे लगेच दूर होतो. रात्री झालेली चांगली झोप तुम्हाला सकाळी फ्रेश करते. पण जर झोप तुमचा दिवस चोरी करून गेला तर. जर तुम्ही चालता-फिरता देखील झोपू लागले आणि अनेक दिवस परत उठले नाहीतर. तुम्ही विचार करत असाल की असे कधी होत असते का, तर तुमच्या माहितीसाठी असे एक गाव आहे जेथे असेच काहीसे होते, जेथे लोक चालता-फिरता झोपी जातात. त्यांना रस्त्यावर, ऑफिसमध्ये, मैदानात म्हणजे कोठेही आणि कधीही झोप लागते. अजूनही तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्हाला या गावाची माहीती आणि येथे असलेल्या झोपेच्या रहस्या बद्दल माहीती देतो.

येथे आहे हा रहस्यमय आजार

खरतर कजाकिस्तान मधील एक छोटेसे गाव आहे. कलाची, जेथे मागील काही वर्षा पासून राहत असलेल्या लोकांना एका वेगळ्या प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. समस्या ही आहे की लोक कधी पण, चालता-फिरता झोपी जातात. तसे झोपणे ही समस्या नाही आहे पण समस्या या गोष्टीची आहे की जर हे एकदा झोपले तर हे अनिश्चित असते की ते पुन्हा केव्हा उठतील. असे सांगितले जाते की अनेक वेळा हे लोक अनेक आठवडे असेच झोपून राहतात. जे काय ते मृत झालेले असतील पण एक दिवस अचानक ते पुन्हा उठतात.

वैज्ञानिक पण हैरान आहेत

गावाची ही समस्या पाहून वैज्ञानिक लोक देखील हैरान झाले आहेत की असे का होत आहे? अशी वेळीअवेळी झोप येण्याची समस्येच्या मागे वैज्ञानिक लोकांनी मोठा शोध घेतला ज्यामध्ये समजले की जवळपास 810 लोकसंख्या असलेल्या या गावातील जवळपास 200 लोक या समस्येने पिडीत आहेत. तर असेही समोर आले आहे की याच झोपे मध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

वैज्ञानिक परीक्षणामध्ये असे समोर आले आहे की या क्षेत्रामध्ये कार्बन मोनो ऑक्साईड आणि हाइड्रो कार्बन चा स्तर सामान्य पेक्षा भरपूर जास्त आहे. ज्यामुळे येथील लोकांना आवश्यक तेवढे ऑक्सिजन मिळत नाही आणि लोक या रहस्यमय झोपेचे शिकार होतात. पण प्रश्न हा उद्भवतो की जर या रहस्यमय झोपे मागे हे कारण आहे तर या गावातील सर्व लोकांवर याचा प्रभाव पडला पाहिजे. फक्त काही लोक यामुळे पिडीत का आहेत?

समोर आले हे कारण

पण जेव्हा याचे पहिले कारण मान्य नाही झाले तेव्हा वैज्ञानिक लोकांनी याचा पुन्हा शोध केला आणि या निष्कर्षावर आले की या क्षेत्रात बंद पडलेल्या युरेनियमच्या खाणी आहेत ज्यामधून भरपूर प्रमाणात कार्बन मोनो ऑक्साईड निघते, जी लोकांच्या या समस्येसाठी कारण ठरत आहे. पण प्रश्न अजूनही तसाच आहे की दुसऱ्या लोकांवर त्याचा प्रभाव का नाही. याप्रकार ही समस्या मागील 8 वर्षा पासून गावातील लोकांच्या सोबत कजाकिस्तानच्या वैज्ञानिक लोकांना देखील त्रास देत आहे. त्यामुळे या समस्येचे कोणतेही निश्चित समाधान मिळत असल्याचे दिसत नसल्यामुळे सरकारने सध्या यागावातील लोकांना तेथून काढून टाकले आहे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे केली आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दाताला लागलेल्या किडेमुळे वैतागले असाल तर करा हा उपाय, दात कायम राहतील मजबूत

Related Articles

Back to top button