People

हे आहेत बिल गेट्स चे 6 सिंपल रूल, बी-स्कूल पण नाही शिकवू शकत या गोष्टी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्स चे हे सिंपल रूल तुम्हाला कोणत्याही बिजनेस स्कूलमध्ये किंवा कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवले जाणार नाहीत. आम्ही तुम्हाला बिल गेट्स चे ते सिंपल रुल्स सांगत आहोत जे तुम्हाला आयुष्यात, नोकरीत आणि बिजनेस मध्ये पुढे जाण्यास मदत करतील.

लाईफ सोप्पे नाही, याची सवय लावा

लाईफ मध्ये जे तुम्हाला हवे आहे ते मिळत नाही आहे तर त्यामुळे निराश होऊ नका. आपल्या रागाला आणि फ्रस्टेशनला चैनलाइज्ड करा आणि लाईफला योग्य दिशेने घेऊन जा. आयुष्यात कितीपण समस्या आल्यातरी आपल्या ध्येयाकडे पुढे जाणे थांबवू नका.

लाइफ मध्ये चांगल करा, सन्मान आपोआप मिळेल.

जगात कोणीही तुमच्या सन्मानाची काळजी करत नाही. जग तुम्हाला स्वतासाठी काही अचीव करण्यासाठी सांगते. त्यानंतर लोक तुमचा सन्मान करतात आणि तुमच्या बद्दल चांगला विचार करतात.

काय बनू शकता, याचा शो-ऑफ करू नका

तुम्ही भविष्यात काय बनू शकता याचा शो-ऑफ करण्याची काही गरज नाही. तुम्ही जाळ्यात अडकू नका आणि आपल्या स्वप्नांना तेव्हा पर्यंत सुरक्षित ठेवा जो पर्यंत ते पूर्ण होत नाहीत. जेव्हा तुम्ही आपले लक्ष मिळवाल तेव्हा ते परत करणे विसरू नका. ज्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील.

कॉलेज मधून बाहेर पडल्यावर लगेच तुम्ही वाइस प्रेसिडेंट नाही बनू शकत

तुम्ही कॉलेज मधून बाहेर पडल्यावर लगेच 60,000 डॉलर महिना कमवू शकत नाही. तुम्ही सरळ वाइस प्रेसिडेंट नाही बनू शकत. हळूहळू मोठे बना. तुम्ही एका दिवसात शिखरावर नाही पोहचू शकत. तुम्ही जे विचार करता ते तुम्ही करू शकता पण त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. आपल्या यशाला पचवणे शिका.

जर तुम्हाला वाटते की तुमचा टीचर टफ आहे, तर तुम्ही बॉसची वाट पहा

तुम्ही संयम ठेवणे शिका. जर तुमचे शिक्षक आणि मोठी व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुकांवर रागावतात तर ते सहन करण्यास शिका. तुम्हाला नोकरी करताना असे लोक नाही मिळणार जे तुम्हाला तुमच्या चुका सांगतील. त्यांना फक्त कमी वेळात बेस्ट रिजल्ट पाहीजे आणि जर तुम्ही असे नाही केले तर ते तुम्हाला नोकरी वरून काढून टाकतील. आपल्या चुकांना सुधारणे शिका जो पर्यंत तुमच्याकडे वेळ आणि संधी दोन्ही आहे.

तुमचे पेरेंट्स चुकांसाठी दोषी नाहीत.

जर तुम्ही काही चुकीचे करतात तर त्यासाठी आपल्या पेरेंट्सना दोषी ठरवू नका, आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा. तुम्ही तुमच्या प्रत्येक चुकी मधून शिका आणि पुढे जा. दुसर्यांवर दगड फेकणे बंद करा. तुम्ही तेव्हाच उत्तम करू शकाल जेव्हा तुम्ही तुमच्या चुका आणि कमतरतेचा सामना कराल. तुम्ही तुमच्या चुका सुधारण्यासाठी आपल्या पेरेंट्स वर अवलंबून राहू नका.


Show More

Related Articles

Back to top button