foodhealth

फक्त या एका परस्थिती मध्ये फ्रीजचे थंड पाणी सेवन करू नये, ठरू शकते धोकादायक

उन्हाळा सुरु झाला आहे. आपण बाटलीमध्ये पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवतो. कारण आपल्याला असे वाटते की जर थंड पाणी प्यायले नाही तर आपली तहान जाणार नाही. लोक घरामध्ये आल्यावर किंवा गरम झाल्यावर आपली तहान घालवण्यासाठी फ्रिजकडे जातात आणि फ्रिजमधे थंडगार पाण्याची बाटली काढून थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात. तर काही लोकांना एकदम थंड पाणी पसंत नसते. जर तुम्हाला एकदम थंड पाणी आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या माहितीसाठी थंड पाणी हे फक्त गळयासाठीच नुकसानदायक नसते संपूर्ण आरोग्यासाठी नुकसान दायक असते फ्रिजचे थंड पाणी पिण्यामुळे आरोग्याला अनेक नुकसान होऊ शकतात हे समजणे तुम्हाला अत्यावश्यक आहे. चला तर पाहूया फ्रिजचे थंड पाणी पिण्यामुळे आपल्या आरोग्याला काय नुकसान होतात.

खरतर आरोग्य तज्ज्ञांच्या मते स्त्रीचे थंड पाणी पिणे आपल्या आतड्यांना आकुंचित करतात ज्यामुळे अन्न योग्य पद्धतीने पचन होत नाही. अन्नपचन न झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामधील सर्वात महत्त्वाची समस्या बद्धकोष्ट आहे. आयुर्वेदा मध्ये बद्धकोष्ट हे सर्व आजारांचे मूळ असल्याचे सांगितले गेले आहे. याप्रकारे फ्रीजचे थंड पाणी पिण्यामुळे झालेले बद्धकोष्ट आपल्या शरीराचे संपूर्ण तंत्र बिघडवते, त्यामुळे अनेक आजार जन्माला येतात.

आपल्या शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते. त्यामुळे जर आपण फ्रीजचे थंड पाणी प्यायले तर बॉडीला तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक एनर्जी खर्च करावी लागते आणि या कारणामूळे शरीराची ऊर्जा अनावश्यक पणे खर्च होते. त्याच प्रमाणे यामुळे शरीरा मध्ये पोषकतत्वांची कमी निर्माण होते.

सारखे थंड पाणी पिण्यामुळे शारीरिक तंत्र आकुंचित पावते त्यामुळे कोशिकांचे सारखे सारखे आकुंचित होण्याचा परिणाम शरीराच्या पचनशक्तीवर पडतो याचा वाईट प्रभाव हृद्य गतीवर होतो.

फ्रिजमध्ये ठेवलेले पाणी कृत्रिमपणे थंड होते तापमान नियंत्रित नसल्यामुळे ते सारखे सारखे थंड आणि गरम होत असते साधारणपणे फ्रीजमध्ये ठेवलेले पाण्याचे तापमान सामान्य पेक्षा अत्यंत कमी असते आणि या कारणामुळे सर्दी खोकला इत्यादी समस्या होऊ शकतात सोबतच असे थंड पाणी पिण्यामुळे फुफुसाचे घातक आजार होऊ शकतात.

फ्रिजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिण्यामुळे गळा खराब होऊ शकतो तसेच दररोज फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे टॉन्सिल्सची समस्या होऊ शकते यासाठी चांगले राहील फ्रीजमधील पाणी पिण्या ऐवजी माठातील पाणी प्यावे.


Show More

Related Articles

Back to top button