astrology

शुक्रवारी केलेला हा उपाय रातोरात बदलू शकतो नशीब, बनवू शकतो तुम्हाला श्रीमंत

आजच्या काळात पैश्यांचे महत्व कोणालाही सांगण्याची गरज नाही. आज पैसा सर्व काही आहे, ज्याला पाहावे तो पैश्यांच्या मागे धावत आहे. अनेक लोक तर पैश्यासाठी एखादे चुकीचे काम करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. असे बोलले जाते कि वाईट काम करून मिळवलेला पैसा नेहमी सोबत दुखः घेऊन येतो, तर चांगले काम करून कमावलेला पैसा सोबत व्यक्तीसाठी आनंद घेऊन येतो. पैश्यांची गरज सगळ्यांना असते.

जो श्रीमंत आहे त्याला देखील पैश्यांची गरज असते, ज्यामुळे तो नेहमी श्रीमंत राहील तर गरीब आपले जीवन सुरळीत चालावे यासाठी पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांच्यासाठी पैसे आपल्या गरजा पूर्ण करण्याचे एक साधन आहे. पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळे कष्ट घेतात. काही लोक त्यांच्या प्रयत्नात यशस्वी देखील होतात तर काही लोकांच्या हाती निराशा येते. अनेक प्रयत्न करून देखील त्यांची गरिबी दूर होत नाही.

हिंदू धर्मामध्ये धन प्राप्तीसाठी अनेक उपाय सांगितले आहे. हिंदू धर्मात धनाची देवी लक्ष्मी मानली गेली आहे. माता लक्ष्मीच्या पूजनाने धन प्राप्तीचे योग बनतात. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस मानला गेला आहे. शुक्रवारच्या दिवशी केलेल्या काही उपायामुळे शुक्र ग्रह देखील अनुकूल होतो याच सोबत माता लक्ष्मीची देखील कृपा होते. आज आम्ही तुम्हाला इलायचीचा एक असा उपाय सांगत आहोत जो तुमचे नशीब रातोरात बदलू शकते. या उपायाने घरामध्ये धन-दौलत येण्यासोबत तुमची मनोकामना देखील पूर्ण होतील. हा उपाय शुक्रवारी रात्री 12 वाजता करायचा आहे.

असा करा हा उपाय

शुक्रवारी रात्री 12 वाजता सर्वात पहिले व्यवस्थित हात-पाय धुवून स्वच्छ बना आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

यानंतर कमळाच्या आसनावर बसलेल्या माता लक्ष्मीच्या फोटोला घरातील शांत आणि स्वच्छ ठिकाणी प्रस्थापित करा.

आता फोटो समोर तीन इलायची ठेवा आणि आपल्या इष्टदेवाचे ध्यान करा. यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे ध्यान करत शुक्रदेवास आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी सांगा.

यानंतर “ऊं द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:” या शुक्र मंत्राचा 21 वेळा जप करा.

मंत्र जप केल्यानंतर 3 इलायची आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवा आणि सगळ्या ग्रहांचे ध्यान करत जीवनातील सगळ्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

यानंतर मुठ उघडून यावर तीन वेळा फुंकर मारा. आता इलायची एखाद्या भांड्यात ठेवून घराच्या मुख्य दरवाजावर घेऊन जा.

आता ज्या भांडया मध्ये इलायची ठवली आहे त्यामध्ये कापूर टाकून जाळा. जेव्हा इलायची पूर्णतः जळेल तेव्हा ती तुळशीच्या रोपट्यामध्ये टाका.

जर तुळशी नसेल तर वाहत्या नदी मध्ये विसर्जित करा. काही दिवसात तुम्हाला या उपायाचा परिणाम पाहण्यास मिळेल.

Show More

Related Articles

Back to top button