Uncategorized

सारा अली खान पेक्षा जास्त सुंदर होती तिची आजी, पण लोक तिला घाबरून थरथर कापत असत कारण…

सारा अली खान बॉलीवूड सेंसेशन झाली आहे. हल्लीच रिलीज झालेला चित्रपट ‘केदारनाथ’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. प्रेक्षकांनी या फिल्म मधील साराच्या अभिनयास पसंत केले आहे. केदारनाथ मध्ये सारा सोबत सुशांत सिंह राजपूत होता. आता तिचा दुसरा चित्रपट रिलीज होत आहे या चित्रपटाचे नाव ‘सिंबा’ आहे . सिंबा मध्ये सारा सोबत रणवीर सिंह आहे. या चित्रपटाला रोहित शेट्टी ने डायरेक्ट केलेले आहे आणि करण जौहर ने प्रोड्यूस केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपट चांगला असेल असा अंदाज लोक बांधत आहेत.

 

अभिनेत्री सारा अली खानला तिचे सौंदर्य तिच्या पूर्वजांकडून मिळालेले आहे. ती जेवढी देखणी आहे तेवढीच मनाने देखील चांगली आहे. ती आपल्या सगळ्या इंटरव्यूज साधेपणाने देते जे लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेसे आहे. लोक असे बोलतात कि सारा अशी पहिली स्टार किड आहे जिच्यामध्ये घमंड नाही आहे. हे सगळे गुण तिला एक यशस्वी अभिनेत्री बनवण्यास मदत करतीलच पण तिचे जे सौंदर्य आहे ते तिला तिच्या आजी कडून मिळालेले आहे म्हणजेच साराच्या आईची आई रुखसाना सुल्ताना यांच्या कडून. तुम्हाला माहित असेलच कि सारा अली खान हिची आई अमृता सिंह आहे परंतु कदाचित हे माहित नसेल कि अमृता सिंह यांच्या आई रुखसाना सुल्ताना देखील अत्यंत सुंदर होत्या आणि तरी देखील लोक त्यांना घाबरत असत. लेखाच्या पुढील भागात पाहू रुखसाना सुल्ताना यांना लोक का घाबरत असत.

सारा पेक्षा जास्त तिची आजी सुंदर होती

साराची आजी रुखसाना सुल्ताना अत्यंत देखण्या आणि सुंदर होत्या. साराला तिचे सौंदर्य तिच्या आजी कडून मिळाल्याची जाणीव वरील फोटो पाहून होते. पण असे असले तरी असे बोलले जाते कि रुखसाना यांना पाहून लोकांचा घाबरून थरकाप होत असे. त्यांना घाबरण्याच्या मागील कारण आणीबाणीच्या वेळी चालवलेला नसबंदी कार्यक्रम होता. रुखसाना आणीबाणीच्या काळात संजय गांधी द्वारे चालवलेल्या नसबंदी कैम्प ची प्रमुख हिस्सा होती. 1975 ते 1977 दरम्यान आणीबाणी लागू होती आणि या दरम्यान नसबंदी कैम्प चालवले गेले होते.

संजय गांधी यांच्यावर तेव्हा पुरानी दिल्ली भागातील मुस्लीम लोकांना नसबंदीसाठी राजी करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती. कुटुंब नियोजनाच्या हेतूने नसबंदीचा मार्ग निवडला गेला होता. त्यांच्या अनुसार देशाच्या विकासासाठी वाढती लोकसंख्या थांबवणे आवश्यक होते. या नसबंदी कार्यक्रमामुळे पुरानी दिल्ली मध्ये लोकांमध्ये जनजागृती पेक्षा जास्त भीती पसरली होती.

जबरदस्ती केली जात होती नसबंदी

18 वर्षाच्या युवकांपासून ते 80 वर्षाच्या वयस्कर लोकांची जबरदस्ती नसबंदी केली जात होती. त्यामुळे तेथील लोक रुखसाना सुल्तानाला पाहून घाबरत असत. पण बीजेपीची सरकार आल्या नंतर रुखसाना बातम्यांपासून दूर गेली. रुखसाना ने शविंदर सिंह सोबत लग्न केले जे खुशवंत सिंहचे पुतणे होते. अमृता सिंह रुखसाना आणि शविंदर सिंह यांच्या कन्या आहेत तर रुखसाना या नात्याने सारा अली खानची आजी होते.

Tags

Related Articles

One Comment

Back to top button