celebritiesPeople

“बाई वाड्यावर या” असा आदेश देणाऱ्या अस्सल मराठी खलनायका बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील.

मराठी रसिकांच्या मनावर चार दशकांहून जास्त काळ अधिराज्य गाजवणारे खरेतर दहशत निर्माण करणारे निळू फुले हे आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांनी आपल्यावर केलेली जादू अजून कमी झालेली नाही. त्यांचा तो करारी आवाज अजूनही लोकांच्या कानामध्ये घर करून राहीला आहे.

त्यांचा जन्म लोखंड आणि भाजीपाला विकण्याचा व्यावसाय करणाऱ्याच्या घरात झाला असला तरी त्यांनी स्वताच्या हिमतीवर मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्ठीमध्ये खास जागा तयार केली. त्यांची नजर, आवाज आणि पाटलाच्या भूमिकेतील बाई वाड्यावर या असा दिलेला आदेश महिलांच्या रागाचे कारण असायचे आणि हेच त्यांचे खरे यश होते. कारण निळूभाऊ खलनायकाची भूमिका करायचे त्यामुळे जर लोकांचा राग त्यांच्यावर नाही आला तर ते त्यांचे अपयश समजले गेले असते. पण तसे कधी झालेच नाही.

सिहासन, सामना या चित्रपटामध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. तर सखाराम बाईंडर या नाटकाने त्यांना थेट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ओळख दिली.

निळू फुले यांचे खरे नाव निलकांत कृष्णाजी फुले असे आहे. कृष्णाजी व सोनाई या दाम्पत्याच्या पोटी पुण्यात निळूभाऊंचा जन्म झाला.

निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करण्याच्या नोकरीवर होते. तेव्हा त्यांना 80 रुपये पगार होता आणि त्यामधील 10 रुपये ते राष्ट्रसेवा दलाला देत होते.

एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रपटामध्ये प्रवेश केला. त्यांनी 140 मराठी आणि 40 हिंदी सिनेमा मध्ये काम केले आहे.  त्यांचा शेवटचा चित्रपट गोष्ट छोटी डोंगराएवढी हा होता.

निळू फुले यांचे निधन 13 जुलै 2009 रोजी पहाटे झाले. त्यांना अन्ननालीकेचा कर्करोग झाला होता त्या आजारामुळे त्यांचे निधन झाले.


Show More

Related Articles

Back to top button