moneyPeople

तुमचे सोने खरे आहे का खोटे? या 5 सोप्प्या पद्धतीने घरीच करू शकता परीक्षा

भारतीय परंपरेमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे, खास करून सोन्याचे दागिने. लग्नाचा सीजन असेओ किंवा दिवाळी-दसरा, सोन्याची मागणी नेहमी राहते. सोने हे लोकांची आजही पहिली पसंत आहे, परंतु याच्या शुध्दतेच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये कायम संशय असतो. जेव्हा लोक आपल्या कष्टाचा पैसा देऊन सोने खरेदी करण्यास पोहचतात तेव्हा सोन्याच्या शुद्धतेच्या बाबतीत जास्त काळजी करतात.

परंतु याबाबतीत घाबरून नाही तर सतर्क राहून काम करण्याची गरज आहे. खरतर सोने खरे आहे का खोटे याची ओळख तुम्ही सहज करू शकता, यासाठी काही सोप्प्या पद्धती आहेत ज्याचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या मेहनतीच्या पैश्याने तुम्ही फक्त शुध्द सोने खरेदी कराल. चला पाहू सोन्याच्या शुध्दतेची ओळख करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत.

तसे सरकारने हॉलमार्कच्या जाहिराती देऊन ग्राहकांना याबाबतीत जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण असे असून सुध्दा लोक पैसे वाचवण्याच्या चक्कर मध्ये फसवणाऱ्या सोनारांच्या बोलण्यात येतात आणि नकली सोने खरेदी करून बसतात.जर तुम्ही कोणत्याही लोकल शॉप मधून ज्वेलरी खरेदी केली आहे आणि त्याच्या शुध्दते बद्दल संशय आहे तर खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही चाचणी करू शकता.

मैग्नेट टेस्ट

सोन्याची शुध्दता तपासण्यासाठी तुम्ही मैग्नेट टेस्ट करू शकता. खरतर सोने हे चुंबकीय धातू नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सोन्याच्या दागिन्याच्या बाबतीत संशय असेल तर त्यास एखाद्या स्ट्रांग चुंबक घ्या आणि त्याला या सोन्याच्या दागिन्याला स्पर्श करा. जर तुमचे सोने चुंबकाकडे थोडेही आकर्षित झाले तर याचा अर्थ सोन्यात भेसळ आहे. यासाठी यापुढे तुम्ही मैग्नेट टेस्ट करूनच सोने खरेदी करा.

एसिड टेस्ट

एसिड ने देखील तुम्ही खोट्यासोन्याची ओळख करू शकता. यासाठी तुम्हाला सोन्यावर पिनने हलकासा चर्रा पाडायचा आहे आणि नंतर त्या जागी नाईट्रिक एसिडचा एक थेंब टाका. जर सोने लगेच हिरवे झाले तर याचा अर्थ तुमचे सोने खोटे आहे, पण जर सोन्यावर काहीच प्रभाव पडला नाही तर निश्चिंत रहा तुमचे सोने खरे आहे.

सिरामिक थाळीने करा टेस्ट

सिरामिक थाळीने पण तुम्ही सोन्याच्या शुध्दतेची टेस्ट करू शकता, यासाठी बाजारातून एक सिरामिक थाळी घेऊन या आणि आपल्या सोन्याच्या दागिन्याला त्यावर घासा. जर त्या थाळीवर काळे डाग पडले तर तुमचे सोने खोटे आहे, तर हलक्या सोनेरी रंगाचे डाग पडले तर तुमचे सोने खरे आहे.

वाटर टेस्ट

सोन्याच्या शुद्धतेची टेस्ट घेण्याची सर्वात सोप्पी पद्धत आहे वाटर टेस्ट, यासाठी कोणत्याही भांड्यात जवळपास 2 ग्लास पाणी टाकावे आणि त्यानंतर त्यामध्ये आपली सोन्याची ज्वेलरी टाकावी. थोड्या वेळात जर सोने तरंगताना दिसले तर याचा अर्थ सोने खोटे आहे, तर ज्वेलरी भांड्याच्या तळाला जाऊन बसली असेल तर सोने खरे आहे. कारण सोने कधी तरंगत नाही तर ते दुबते. सोबतच हे लक्षात ठेवा असली सोन्याला कधीही गंज चढत नाही.

दाताने करा टेस्ट

सोन्याची टेस्ट करण्याची अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे सोने काही वेळ दाताच्या मध्ये दाबून ठेवणे. यानंतर जर तुमच्या दाताची निशाणी दिसली तर ते खरे आहे. खरतर सोने अतिक्षय नाजूक धातू आहे, यासाठी यासाठी ज्वेलरी पण कधी प्योर सोन्याची बनत नाही तर यामध्ये काही मात्रेत दुसरे धातू मिक्स केले जातात. पण ही टेस्ट आरामात करा, कारण जास्त जोऱ्यात दाबल्यास सोने मोडू शकते.


Show More

Related Articles

Back to top button