Connect with us

राशिभविष्य 15 जून 2018 : या 4 राशीवर होईल माता लक्ष्मीची कृपा, होईल भरपूर फायदा

Astrology

राशिभविष्य 15 जून 2018 : या 4 राशीवर होईल माता लक्ष्मीची कृपा, होईल भरपूर फायदा

आज शुक्रवार 15 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. काहीही झाले तरी घरगुती जबाबदा-या दुर्लक्षित करू नका. प्रियाराधन करताना डोक्याचा वापर करा कारण प्रेम नेहमी आंधळेच असते. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किती भांडण केले तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हे विसरू नका.

वृषभ राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा पारा चढू शकत, त्यामुळे त्या तयारीत राहा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

मिथुन राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.

कर्क राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल, पण खर्चिकदेखील ठरेल, विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. जर कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोन बाजूला ठेवला नाहीत तर तुमच्या हातून कदाचित घोडचूक होईल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा.

सिंह राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. स्वत:ला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याचवेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझविणाºया गोष्टींवर थोडा वेळ खर्च करा. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला चांगला मित्र आज कदाचित त्रास देऊ शकतो. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

कन्या राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमची समस्या गंभीर आहे – पण तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. प्रवासाच्या संधी शोधाल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

तुल राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज कामकाज धकाधकीचे, थकविणारे ठरेल – परंतु तुमची मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि श्रांत मनोवृत्तीत राहाल. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

धनु राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. अर्थविषयक अनिश्चिततेमुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होईल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. आपल्या प्रिय व्यक्तीचे कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

मकर राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमचया कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

कुम्भ राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

मीन राशी भविष्य (Friday, June 15, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. प्रणयराधनेचा मूड अचानक बदलल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. कामच्या ठिकाणी असलेला दबाव आज त्रासदायक ठरू शकतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top