astrology

राशिभविष्य 2 जून 2018 : शनिदेवाच्या कृपेने या 6 राशींचा आज होईल फायदा, वाचा राशिभविष्य

आज शनिवार 2 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीयदेखील मोहीत होतील. पण तुमची उत्तेजना नियंत्रणात ठेवा. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, तुमचा/तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल.

मिथुन राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

कर्क राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.

सिंह राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

भावनिकदृष्ट्या आजचा दिवस काही खास नाही. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ताणतणावांचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तूटू शकते. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुमचा/तुमची तुमच्याविषयी आणि तुमच्या लग्नाविषयी वाईट गोष्टी सांगण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मन:शांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. तुमचे प्रेम असफल ठरेल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल.

तुल राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. बाहेरगावी जाऊन पार्टी करणे, प्रणयराधन करायला मिळण्याची शक्यता असल्याने उत्साह निर्माण होईल परंतु त्यामुळे तुम्ही थकून जाल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. आजच्या दिवशी तुमच्या संयमाची परीक्षा होणार आहे; त्यामुळे कामाच्या ठिकाणी आज तो घालवू नका.

धनु राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर रहा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.

मकर राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमची प्रिय व्यक्ती जवळ नसल्याने तुम्ही व्याकूळ व्हाल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा/तुमची जोडीदार आज आजारी पडण्याची शक्यता आहे.. त्यामुळे काळजी घ्या.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.

मीन राशी भविष्य (Saturday, June 02, 2018)

इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.


Show More

Related Articles

Back to top button