‘अरे बापरे किती हा एटीट्युड’ रानू मंडल विसरली जुने दिवस, महिला फैन ने सेल्फीसाठी रिक्वेस्ट केली तर म्हणते ‘मला हात कसा लावलास ?’

काही सेकंदाचा व्हिडीओ वायरल झाल्या नंतर रानू मंडल (Ranu Mondal) चे नशीब बदलले आणि सगळीकडे तिची स्तुती झाली ज्यामुळे तीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. रानूचा आवाज अनेकांना आवडला होता आणि तिचे प्रशंसकांची संख्या सतत वाढत आहे. पण याच दरम्यान रानू मंडल चा एक व्हिडीओ वायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये रानू आपल्या प्रशंसकास असे काही म्हणत आहे जे पाहून आपल्याला मुळीच विश्वास होणार नाही. या व्हिडीओ मध्ये साधी आणि सरळ दिसणाऱ्या रानू ने आपल्या प्रशंसकाने सेल्फी काढण्याच्या रीक्वेस्टवर भडकून उत्तर दिले आहे.

या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता कि रानू मंडल चारी बाजूने लोकांनी घेरली गेली आहे. रानू दुसरीकडे पाहत असताना एक महिला फैन येते ती रानूचा हात पकडते आणि सेल्फी घेण्यासाठी बोलते. या महिला फैन ने हात पकडल्याने रानू भडकते आणि महिलेला रागावते. या व्हिडीओ मध्ये रानू मंडल महिलेला म्हणत आहे कि ‘आपने मुझे छुआ कैसे? मै अब एक सेलिब्रिटी हूं.’

 

View this post on Instagram

 

Social | Don’t touch me; I’m celebrity now. #ranumondal #Kolkata #Bollywood #bollywoodfashion #bollywoodnews #bollywoodcelebrity #Mumbai #Filmcity #IndianHistoryLive

A post shared by Indian History Pictures (@indianhistorylive) on

व्हिडीओ मध्ये रानू भरपूर रागावलेली दिसत आहे जे व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. रानू फिमेल फैन ला म्हणते ‘इस तरह से छुने का मतलब क्या है’ पण महिला प्रशंसक रानूच्या या बोलण्याचे वाईट वाटून घेत नाही आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. रानू मंडल ने महिला प्रशंसका सोबत केलेली अशी वर्तणूक लोकांना आवडलेली नाही आणि ते रानूला ट्रो’ल करत आहेत.

आपल्याला माहीत असेलच कि रानू मंडल पश्चिम बंगाल मधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. अतीन्द्र नावाच्या व्यक्तीने रानूचा व्हिडीओ रिकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. ज्यानंतर रानू रातोरात स्टार झाली. रानूचा जेव्हा पहिला व्हिडीओ आला होता तेव्हा तिची परिस्थिती अगदीच हालाखीची होती. विस्कटलेले केस, फाटकी साडी मधील रानूचा तो व्हिडिओ पाहून सगळे सुन्न झाले होते. हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर सगळीकडे रानूचा आवाज ऐकण्यास मिळत होता.

रानू ला बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार आणि अभिनेता हिमेश रेशमिया याने आपल्या फिल्म मध्ये गाणे गाण्याची संधी दिली. रानूचे पहिले बॉलिवूड गाणे ‘तेरी मेरी कहानी’ चे रेकॉर्डिंग व्हिडीओ हिमेश ने शेयर केले होते. या नंतर रानू ने हिमेशसाठी तीन गाणे गायली. रानू आपल्या पश्चिम बंगाल मधील जुन्या घरात राहते. हल्लीच एक पोस्ट करून माहिती देण्यात आली कि रानू आपल्या बायोपिक वर काम करत आहे. रानू चा बायोपिक फिल्ममेकर ऋषिकेश मंडल बनवत आहेत.