inspiration

वाईट काळात कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवून वाचू शकता समस्ये पासून

एका गावाच्या बाहेर दोन साधू झोपडी बांधून राहत होते. दोन्ही साधू रोज सकाळी वेगवेगळ्या जागी जाऊन भिक्षा मागत असत आणि संध्याकाळी झोपडी मध्ये परतत असत. दिवसभर परमेश्वराचा जपतप करत. याच पद्धतीने त्यांचे जीवन चालू होते. एक दिवस दोन्ही साधू वेगवेगळ्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. संध्याकाळी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना समजले कि गावामध्ये वादळ आले होते.

  • पहिला साधू झोपडी जवळ गेला तेव्हा त्याने पाहिले कि वादळामुळे झोपडी अर्धी तुटली आहे. हे पाहून तो क्रोधीत झाला आणि परमेश्वरास वाईट बोलू लागला. तो बोलू लागला कि मी दररोज तुझे नामस्मरण करतो, मंदिरामध्ये जाऊन पूजा करतो, दुसरीकडे गावात चोर-लबाड लोकांचे घर चांगली आहेत, पण आमचे झोपडे मोडलेस. आम्ही दिवसभर पूजा-पाठ करतो, पण तुला आमची काळजी नाही आहे.
  • जेव्हा दुसरा साधू झोपडी पर्यंत पोहचला तेव्हा त्याने देखील पाहिले कि वादळामुळे त्यांची अर्धी झोपडी मोडली आहे. हे पाहून तो आनंदी झाला. परमेश्वराचे आभार मानू लागल. साधू म्हणाला, हे परमेश्वरा आज मला विश्वास झाला कि तू आमच्यावर खूप प्रेम करतोस. आमची भक्ती आणि पूजा-पाठ व्यर्थ नाही गेली. एवढ्या भयंकर वादळामध्ये देखील तुम्ही आमची अर्धी झोपडी वाचवलीत. आता आम्ही आरामात या झोपडी मध्ये आराम करू शकतो. आज माझा विश्वास अजून जास्त वाढला आहे.

या प्रसंगातून काय शिकण्यास मिळते

दोन एक सारख्या व्यक्तींच्या जीवनामध्ये एक सारखी घटना घडली, पण दोघांच्या विचारात फरक होता. एकाचे विचार सकारात्मक होते आणि दुसऱ्याचे नकारात्मक. वाईट काळामध्ये आपले विचारच आपल्याला सुख किंवा दुखः देते. जर आपण वाईट विचार केला तर दुखी होऊ. यासाठी प्रत्येक परिस्थिती मध्ये आपल्याला चांगले विचार केले पाहिजेत. दुसऱ्या साधूने चांगला विचार केला सकारात्मक विचार केला म्हणून तो वाईट काळात देखील आनंदी होता.

Related Articles

Back to top button