Weight loss tips : वजन वाढतेय! काळजी सोडा, आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा..

Weight loss tips : वजन वाढीमुळे अनेक लोक त्रस्त असतात. अनेक प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. अशा परिस्थितीत लोक असाकाही उपाय शोधतात की भात खाणेही चुकणार नाही आणि लठ्ठपणा देखील वाढणार नाही.

यावर उपाय म्हणजे तपकिरी तांदूळ (Brown rice). त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे (Vitamins and minerals) देखील असतात. यामध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, लोह, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फायबर असते.

तपकिरी तांदूळ कसे वजन कमी करते?

पांढऱ्या तांदळाच्या तुलने मध्ये तपकिरी तांदळा मध्ये तीनपट अधिक फायबर असते. फायबर वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अल्प प्रमाणात स्टार्च असते.

तर पांढरा तांदूळ कार्बोहायड्रेटयुक्त अन्न आहे. यामुळे पांढरा भात जास्त खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तपकिरी तांदूळ जास्त खाण्यापासूनही तुमचे रक्षण करतो.

वजन कमी करण्यासाठी तपकिरी तांदूळ चांगले

तपकिरी तांदूळ खाण्यामुळे पोट चांगले भरते. त्यामुळे आपणास वारंवार भूक लागत नाही आणि आपण अति खाण्यापासून वाचू शकतो. तर पांढरा तांदूळ लवकर पचतो, त्यामुळे लवकर भूक लागते आणि अन्न वारंवार खाल्ल्याने वजन वाढते. यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राइस अधिक फायदेशीर आहे असे मानले जाते.

ब्राऊन राइसचे इतरही फायदे आहेत

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांवरही (high blood pressure and heart diseases) हे खूप फायदेशीर आहे. याच्या रोजच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो. हे पेशींचे कर्करोगापासून संरक्षण करते. तपकिरी तांदळात सेलेनियम आणि मॅंगनीज आढळतात. सेलेनियम थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करते. मॅंगनीज शरीराला ऊर्जावान ठेवते.