सेफ्टीच्या बाबतीत या भारतीय गाड्यांचे पितळ उघडे पडले, जाणून घ्या तुमची आवडती कार किती सुरक्षित आहे

भारतामध्ये बहुतेक कार कंपन्या मध्ये बजेट सेगमेंट मध्ये कार लॉन्च करण्याची स्पर्धा असते. पण असे करताना या कंपन्या सुरक्षा नियमा सोबत तडजोड करतात. हेच कारण आहे ज्यामुळे भारतातील बहुतेक कार ग्लोबल एनसीएपी (Global NCAP) च्या कार क्रैश टेस्ट मध्ये अपयशी होतात. यामध्ये भारतातील सगळ्यात जास्त पॉप्युलर कार सैन्ट्रो आणि वैगनआर देखील समाविष्ट आहेत.

ग्लोबल ग्लोबल एनसीएपी टेस्ट मारुति-सुजुकी वैगन आर, अर्टिगा, हुंडई सेंट्रो, आणि डैटसन रेडीगो यांच्यावर झाली. यापैकी एकही कार क्रैश टेस्ट पास करू शकली नाही. या टेस्टच्या अनुसार प्रत्येक मॉडलचे एंट्री लेव्हल वर्जन टेस्ट केले होते. ज्यामध्ये Ertiga फक्त अशी गाडी होती ज्यामध्ये स्टैण्डर्ड दोन एयरबैग्स (AirBags) होत्या, तर इतर गाड्यांमध्ये फक्त एकच एयरबैग लावलेले होते.

Maruti Suzuki Eriga : या गाडीला सगळ्यात जास्त 5 पैकी 3 स्टार मिळाले. या कारच्या फ्रंट सीटच्या ड्रायव्हर आणि को-ड्रॉयव्हरला सुरक्षित नसल्याचे टेस्ट मध्ये आढळले. दुर्घ’टनेच्या वेळी मागील सीट वर बसलेल्या लोकांना देखील गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले. यामध्ये सेफ्टी साठी फ्रंट सीटबेल्ट प्रिटेंशनर्स आणि ड्युल एयरबैग्स आहेत. पण कार मध्ये साइड बॉडी, साइड हेड आणि ड्रायव्हरच्या गुडघ्या खाली एयरबैग नाही दिले आहेत.

Maruti Suzuki WagonR : या कार ने 5 पैकी फक्त 2 स्टार मिळवले आहेत. या गाडीच्या ड्रायवर सीट वर एयरबैग असून देखील फ्रंट सीट वर बसलेल्या दोन्ही लोकांच्या पायांना, जांघा आणि छातीला गंभीर दुखापत होऊ शकते. WagonR मध्ये सेफ्टीसाठी फक्त ड्रायव्हर सीट वर एयरबैग लावलेले आहेत. त्याच सोबत SBR आणि ABS सारखे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत.

Hyundai Santro : ग्लोबल एनसीएपी क्रैश टेस्ट च्या पाहणी मध्ये या कार ने देखील 5 पैकी फक्त 2 स्टार मिळवले आहेत. हि गाडी देखील ड्रॉयव्हर आणि गाडीत बसलेल्या इतर लोकांच्यासाठी असुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. या कार मध्ये सेफ्टी च्या नावाखाली केवळ ड्रॉयव्हर सीट वर एयरबैग, SBR आणि ABS दिलेलं आहे.

Redi-Go : ग्लोबल एनसीएपी क्रैश टेस्ट च्या पाहणी मध्ये डैटसन ही भारतातील सगळ्यात असुरक्षित गाडी असल्याचे सांगितले आहे. या गाडीने 5 स्टार पैकी फक्त 1 स्टार मिळवला आहे. या कार मध्ये सेफ्टीसाठी फक्त ड्रायव्हरसाठी एयरबैग आणि एबीएस दिलेले आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतेही सेफ्टी फीचर्स कार मध्ये नाही आहेत.

टाटा नेक्सॉन भारतातील सगळ्यात जास्त सुरक्षित कार

टाटा नेक्सॉन ही कार आजही भारतातील सगळ्यात जास्त सुरक्षित कार आहे. मागील वर्षी ग्लोबल एनसीएपी क्रैश टेस्ट मध्ये या गाडीने 5 पैकी 5 स्टार्स मिळवले होते. कार उत्पादक कंपन्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नसल्याचे या पाहणीत दिसून आले. सरकार कडून एबीएस, सीट-बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलार्म आणि ड्राइवर साइड एयरबैग या सारखे सेफ्टी फीचर्स बंधनकारक केलेले असताना देखील कार कंपनीच्या या गाड्या क्रैश टेस्ट मध्ये अपयशी झाल्या आहेत.

हि पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा कारण प्रत्येक भारतीय नागरिकाला हे समजलं पाहिजे कि आपण ज्या आपल्या स्वप्नातल्या गाडीसाठी लाखो रुपये खर्च करतो किंवा करणार आहोत ती आपल्यासाठी किती सुरक्षित आहे. कारण जर अश्या असुरक्षित गाड्यांची खरेदी करून आपण आपल्यासाठी संकट विकत घेण्यासारखेच आहे..