Connect with us

मच्छर पळवण्यासाठी केमिकल वापरणे विसरा आता, वापरा हे घरगुती उपाय

Health

मच्छर पळवण्यासाठी केमिकल वापरणे विसरा आता, वापरा हे घरगुती उपाय

नैसर्गिक पणे वातावरणामध्ये अनेक जीव जंतू असतात. मच्छर देखील त्याच पैकी एक जीव आहे. जो दिसण्यास तर लहान आहे पण अत्यंत धोकादायक आहे. मच्छर तेथे जास्त असतात जेथे उष्णता आणि आद्रता जास्त असते. हेच कारण आहे की भारता मध्ये मच्छर आहेत. मच्छर सर्वात जास्त पावसाळ्यात त्रासदायक आणि धोकादायक ठरतात. पावसाळयामध्ये जेव्हा पाणी जागोजागी साचते तेव्हा त्याजागी त्यांची पैदास होते. तसे पाहता भारता मध्ये वर्षभर मच्छर त्रास देतातच. पण पावसाळया मध्ये त्यांचा त्रास भयंकर होतो.

मच्छर मुळे अनेक खतरनाक आजार होतात. जसे डेंगू, चिकनगुनिया, ताप इत्यादी सर्व आजार अत्यंत त्रासदायक आणि गंभीर असतात. मच्छराच्या या त्रासाला वैतागून तुम्ही नक्कीच एखाद्या केमिकल युक्त उपायाचा आधार घेत असाल. पण केमिकल युक्त उपाय मछारांच्या सोबत आपल्यावरही साईड इफेक्ट करत असतात. चला तर आज आपण पाहू केमिकलचा वापर न करता घरगुती उपायाने मच्छर कसे दूर पळवता येतील.

कापूर

जर तुम्ही हिंदू धर्मीय असाल आणि तुमची देवावर श्रद्धा असेल तर तुमच्या घरामध्ये कापूर हा नक्कीच असेल. देवाची आरती करण्यासाठी आपण कापूर नेहमीच वापरतो. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की कापूर जाळल्यामुळे त्याच्या सुगंध आणि धुरामुळे दुषित वायू दूर होतो. कापूर वापरून मच्छर दूर पळवता येतात. मच्छर पळवण्यासाठी एका भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कापूर टाकून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यानंतर काही वेळातच याच्या धुरामुळे मच्छर दूर पळतील. हा उपाय दररोज केल्याने मच्छरा पासून सुटका मिळू शकते.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

निसर्गात असे अनेक प्रकारचे पाने आणि जडीबुटी आहे ज्यांचा धूर केल्याने मच्छर दूर पळून जातात. कडुलिंबाची पाने जाळल्याने निर्माण होणारा धूर मच्छर दूर पळवतो.

लिंबू आणि लवंग 

मच्छरांना आंबट वस्तू आवडत नाहीत. लिंबू दोन तुकड्यात कापा आणि त्यामध्ये शक्य तेवढ्या लवंग लावा. आणि लवंग वाला भाग वरच्या बाजूस करा. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा वास (गंध) निर्माण होईल जो मच्छरांना आवडत नाही आणि त्यामुळे ते घरातून पळून जातील.

भौतिक अडथळा

मच्छर घरात येऊ देऊ नका. संध्याकाळ पूर्वी घराचे सर्व दारे खिडक्या बंद करा ज्यामुळे मच्छर घरात येऊ शकणार नाहीत. आपल्या शरीराला संपूर्ण झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी मच्छरदाणी वापरा.

 

लवंग आणि खोबरेल तेल

लवंग आणि खोबरेल तेलाचे मिश्रण शरीरावर लावा. असे केल्यामुळे तुमच्या शरीराच्या आसपास मच्छर येणार नाहीत.

पाणी जमा होऊ देऊ नका

घरातील कोणत्याही भागात पाणी जमा होऊ देऊ नका. पाणी जमा झाल्याने त्यामध्ये मच्छर आपली पैदास करतात. यामुळे जर घरात पक्ष्यांना ठेवलेले पाणी असो किंवा कुलरचे पाणी याकडे लक्ष ठेवा आणि पाणी बिल्कुल जमा होऊ देऊ नका.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top