Astrology
मोरपीसांचे 7 उपाय, एक ही केला तर घरात राहील सुखशांती
मोरपंख म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मोर दिसतोच पण त्याच सोबत डोळ्यासमोर येतात ते भगवान श्रीकृष्ण. आपल्या मस्तकावर श्रीकृष्ण नेहमी मोरपंख धारण करत असत. यामुळे मोरपंख म्हणजेच मोरपीस अतिशय पवित्र मानले जाते. याच्या शुभ प्रभावाने घर-परिवारातील समस्या दूर होतात. जर कुंडली मध्ये दोष असतील तर त्यांचे अशुभ फळ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. चला पाहू मोरपंखाचे काही उपाय.
पहिला उपाय : घरामध्ये मोरपंख ठेवण्यामुळे वास्तू दोष आणि कुंडली दोष दूर होऊ शकतात. मोरपीस अश्या जागी ठेवावे जेथून ते सहज दिसेल. मोरपीस घरातील नकारात्मक उर्जा दूर करून सकारात्मक उर्जा वाढवते.
दुसरा उपाय : घर किंवा बेडरूमच्या आग्नेय दिशेला मोरपीस लावावा. काही दिवसातच सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. या दिशेला मोरपंख लावल्यामुळे घरात बरकत येते.
तिसरा उपाय : जो व्यक्ती नेहमी आपल्या जवळ मोरपंख ठेवतो त्याचा राहू दोष कमी होतो.
चवथा उपाय : आकर्षण वाढवण्यासाठी मोरपीस खिश्यात किंवा पर्स मध्ये ठेवावा.
पाचवा उपाय : सरस्वती मातेची कृपा मिळवण्यासाठी विद्यार्थांनी आपल्या जवळ मोरपंख ठेवले पाहिजे.
सहावा उपाय : जर घराच्या प्रवेशद्वार (मुख्यद्वार) संबधी वास्तूदोष असल्यास दरवाजावर तीन मोरपंख लावावे. मोरपंखाच्या खाली भगवान गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यामुळे वास्तुदोष दूर होतो.
सातवा उपाय : मोराचा सर्वात प्रिय आहार हा साप आहे, यामुळे साप मोराला घाबरतात. अश्या जागी साप नाही जात जेथे मोरपंख पाहण्यास मिळतात. यामुळे घरात मोरपंख ठेवल्याने सापांचे भय देखील राहत नाही.
