astrology

या पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही

पैश्याचे महत्व ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याला किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला विचारावे. कारण पैसे नसल्यावर ज्या वेदनेला आणि समस्यांना सामोरे जावे लागते ते ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना समजणार नाही.

आजकाल पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व आहे असे वातावरण झालेले आहे. पैश्यांच्या जोरावर हवे ते केले जाऊ शकते असे नाही पण बऱ्याच गोष्टी केल्या जाऊ शकतात. पैश्याचे महत्व त्याला जास्त वाटते ज्याच्याकडे पैश्यांची कमी असते. ज्याची पर्स नेहमी रिकामी असते.  आजकाल स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येक व्यक्ती पर्स आपल्या जवळ ठेवतो. ज्यामध्ये पैश्यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक वस्तू ठेवल्या जातात. अनेक लोकांना तक्रार असते कि त्यांच्या पर्स मध्ये पैसे येतात आणि संपून जातात किंवा त्यांच्या दिवसाचा खर्च वाढतो ज्यामुळे त्यांची इच्छा नसताना देखील पैसे खर्च होतात. ज्यामुळे त्यांना धनाच्या संबंधित समस्या येतात.

आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून काही अश्या गोष्टी सांगत आहोत ज्या तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होतील. तुम्हाला असे वाटते कि तुम्हाला धनाच्या संबंधित कोणतीही समस्या नसावी आणि तुमचे जीवन समृध्द असावे आणि  तुमच्या जीवनात धनाची कोणतीही कमी नसावी. तर आज आम्ही येथे पर्स मध्ये काही वस्तू ठेवण्या विषयीची माहिती देत आहोत. त्या वस्तू तुम्ही पर्स मध्ये ठेवल्यास तुमची धना संबंधी समस्या दूर होऊ शकतात.

या वस्तू कोणत्या आहेत

तुम्हाला धनाच्या संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर आपल्या पर्स मध्ये भगवान विष्णूची सेवा करत असतानाचा माता लक्ष्मीचा फोटो आपल्या पर्स मध्ये ठेवावा. तुम्ही जर हा फोटो आपल्या पर्स मध्ये ठेवल्यास तुम्हाला याचे शुभ प्रभाव लवकरच पाहण्यास मिळतील. तुमची पर्स पैश्यांनी भरलेली राहील आणि धनाच्या सर्व समस्या दूर होतील.

पर्स मध्ये श्री यंत्र ठेवले तर यामधून येणारी सकारात्मक उर्जा  येईल त्यामुळे तुम्ही स्वताला निरोगी असल्याचे फिल कराल. तुमच्या माहितीसाठी श्री यंत्रामुळे जीवना मध्ये सकारात्मक विचार येतात. आणि तुमचा पर्स कधीही रिकामा राहणार नाही. धनाच्या संबंधीच्या समस्या दूर होतील.

तुम्हाला माहित आहेच कि तुळशी अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे.  जर तुम्ही पर्स मध्ये तुळशीचे पान ठेवले तर पर्स कधीही रिकामे राहणार नाही आणि तुमचा पर्स नेहमी पैश्यांनी भरलेला राहील.  तुम्हाला तुळशीचे पान पर्सच्या मधोमध ठेवायचे आहे. काळ्या रंगाची पर्स वापरू नये. तुळशीचे पान सुकल्या नंतर ते वाहत्या नदी मध्ये किंवा पाण्यात सोडावी. आणि पुन्हा नवीन पान पर्स मध्ये ठेवावे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button