People

धक्कादायक…! ताजमहल आणि लाल किल्ल्याची विक्री झाली

धक्कादायक माहीती समजली आहे की जगातील 7 आश्चर्या पैकी 1 असेलेला ताजमहल आणि दिल्लीचा लालकिल्ला विकला. हे कधी, केव्हा आणि कोणी केले हे आपण पुढे पाहू.

जो विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल ते जग प्रसिद्ध एका ठगाने अनेक वेळा केले आहे. त्याने ताजमहल 3 वेळा, लाल किल्ला 2 वेळा आणि राष्ट्रपति भवन 1 वेळा विकले आहे. अश्या या जगप्रसिद्ध ठगाचे नाव आहे नटवरलाल. हो हा तोच नटवरलाल आहे ज्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अमिताभ बच्चनचा सिनेमा नटवरलाल तयार करण्यात आला होता. चला पाहूया या नटवरलालने अजून काय काय उपद्व्याप करून ठेवले आहेत.

नटवरलाल चा जन्म बिहार मधील सिवान जिल्ह्यातील जीरादेई गावामध्ये झाला होता. याचे खरे नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव होते. परंतु तो लोकांना नटवरलाल यानावाने ओळख देऊन ठगायाचा त्यामुळे त्याची ओळख नटवर लाल अशी झाली. त्याचे नाव एवढे प्रसिद्ध झाले होते की कोणत्याही सामान्य माणसाने दुसऱ्याची फसवणूक केली तर त्या माणसाला लोक नटवर लाल म्हणायचे म्हणजेच नटवर लाल ही एक उपमाच तयार झाली होती.

नटवर लाल ने वकिली पर्यंत शिक्षण घेतले होते. पण त्याचे वकिली मध्ये मन नाही लागले. त्याला काही वेगळे करायचे होते त्यामुळे त्याने चोरी आणि ठगी करण्याचा मार्ग निवडला. त्याची सर्वात पहिली चोरी 1000 रुपयांची होती. जी त्याने आपल्या शेजाऱ्याची खोटी सही करून बँकेमधून काढले होते. त्याला त्यावेळी अंदाज आला की तो कोणाचीही खोटी सही करू शकतो. मग काय त्याने त्याच्या या गुणाचा किंवा म्हणाल तर अवगुणाचा पुरे पुर उपयोग केला.

नटवरलाल ला जास्त चांगली इंग्रजी येत नव्हती पण जेवढी येत होती तेवढी त्याच्यासाठी पुरेशी होती. जर त्याला अजून जास्त इंग्रजी येत असती तर तो कदाचित भारता सोबत संपूर्ण जगामध्ये त्याच्या कारनाम्याने प्रसिध्द झाला असता. एकदा त्याच्या शेजारील गावामध्ये तेव्हाचे राष्ट्रपति डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. नटवरलाल ला त्यांना भेटण्याची संधी मिळाली.

नटवरलाल ने त्यांच्या समोर पण आपल्या कलेचे प्रदर्शन केले आणि राष्ट्रपतिची हुबेहूब स्वाक्षरी करून दाखवून त्याने सर्वांना आश्चर्यचकीत केले. डॉ. राजेंद्र प्रसाद नटवरलाल बद्दल फार प्रभावित झाले. नटवरलाल राष्ट्रपतिना म्हणाला जर तुम्ही एकदा म्हणाले तर मी विदेशी लोकांना त्यांचे कर्ज परत करून त्यांना भारताचे कर्जदार बनवू शकतो. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद त्याला समजावले आणि सोबत येण्यासाठी सांगितले आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले. पण नटवरलाल ला आता नोकरी मध्ये रस कुठे उरला होता. त्याला तर आता मनाला येईल तसे करायचे होते.

त्याच्या हाती आता जादुई चिराग लागले होते ते म्हणजे राष्ट्रपतिची स्वाक्षरी. याच्या मदतीने तो आता जे करणार होता याचा विचार सामान्य माणूस कधी करूच शकत नाही. नटवरलालने राष्ट्रपतिच्या स्वाक्षरीचा वापर करून ताजमहल 3 वेळा, लाल किल्ला 2 वेळा आणि राष्ट्रपति भवन 1 वेळा विकले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे याहून जबरदस्त काम केले.

आजच्या दुनियेत आपण म्हणतो अमका मंत्री विकला गेला आहे, तमका ऑफिसर विकला गेला आहे. पण काय तुम्ही विचार करू शकता की कोणी मंत्र्यांनाच विकून टाकेल. नटवरलाल ने असे केले होते. त्याने संसद भवन त्यामधील 545 खासदारांसह विकून टाकले होते.

नटवरलाल ने फक्त सरकार नाही तर धीरूभाई अंबानी, टाटा आणि बिर्ला सारख्या मोठ्या उद्योगपती लोकांना आपले शिकार केले होते. तसे त्याचे मुख्य शिकार सरकारी कर्मचारी किंवा सामान्य मध्यमवर्गीय लोक असत. नटवरलाल आता फार मोठा अपराधी झाला होता. त्याच्यावर 8 राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त अपराधी केसेस नोंदल्या गेल्या होत्या. 30 अपराध तर असे होते ज्याची सजा त्याला मिळू शकली नव्हती.

नटवरलालला त्याच्या आयुष्यात 9 वेळा पकडण्यात आले आणि त्याला वेगवेगळ्या 14 अपराधासाठी एकूण 113 वर्ष कैद मिळाली होती. पण जेल मधून पळून जायचा. त्यामुळे त्याने 20 वर्षा पेक्षा कमी सजा पूर्ण केली. प्रत्येक वेळी नटवरलाल अतिशय नाटकी पद्धतीने पळून जायचा.

75 वर्षाच्या वयामध्ये 3 हवालदार नटवरलालला घेऊन तिहाड जेल मधून कानपुर घेऊन चालले होते. रेल्वे स्टेशन वर ते लखनऊ मेल पकडण्यासाठी आले. तेव्हा तो जोरजोऱ्यात श्वास घ्यायला लागला आणि एका हवालदाराला औषध आणण्यासाठी पाठवले. तेव्हा त्याने दुसरी चाल खेळली अजून एका हवालदाराला सांगितले लवकर पाणी आण माझा जीव चालला आहे. तो पाणी आणण्यास गेल्यावर त्याने उरलेल्या हवालदाराला बाथरूमला जाण्याचा बहाना केला. नटवरलालच्या हाताला रस्सी बांधली होती पण जेव्हा तो हवालदार नटवरलाल ला घेऊन बाथरूम जवळ गेला तेव्हा पाहतो तर काय रस्सी त्याच्या हातात होती आणि नटवरलाल गायब होता. यानंतर त्या तीनही हवालदारांना निलंबित करण्यात आले.


Show More

Related Articles

Back to top button