celebritiesentertenmentviral

2 बॉल मध्ये 21 रन ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, नाव पाहून तुम्ही देखील व्हाल खुश

भारतामध्ये क्रिकेट या खेळाला धर्माचा दर्जा आहे आणि याचे खेळाडू देव झाले आहेत त्यामुळे क्रिकेटचे नियम आणि त्यामध्ये होणाऱ्या घटना आपल्या लोकांना जवळपास तोंडपाठ असतात किंवा माहीत तरी असतात. पण आज ज्याबद्दल आम्ही माहीती सांगत आहोत ही कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल किंवा याचा तुम्हाला विसर पडला असेल.

तुम्ही विचार करत असाल की 2 बॉल मध्ये 21 रन कसे काय होऊ शकतात आणि हे कोणी केले आहे. तर तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण हे कोणी कधी आणि कसे केले ते पाहू.

या फलंदाजाने केला होता हा पराक्रम

तुमच्या माहीतीसाठी सांगतो हा पराक्रम टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग ने केला होता. आणि त्याने हा पराक्रम पाकिस्तानच्या विरुध्द केला होता हे वाचून तर तुमचा आनंद अजून वाढला असेल. सहवागने 13 मार्च 2004 रोजी पाकिस्तान विरुध्द 2 बॉल मध्ये 21 रन टीम इंडियाच्या खात्यात जमा केले होते.

या दिवशी वीरेंद्र सहवागने राणा नावेद उल हसन या पाकिस्तानी बॉलरच्या विरुध्द 2 बॉल मध्ये 21 रन केले होते. ते कसे केले हे आपण पुढे पाहूया.

या पद्धतीने 2 बॉल मध्ये 21 रन झाले

खरतर पाकिस्तान कडून 11वी ओवर राणा नावेद उल हसन टाकण्यास आला. या ओवरचा पहिला चेंडू त्याने नो बॉल केला आणि सहवागने यावर चौका मारला पुढील बॉल परत नो बॉल होती आणि सहवाग ने पुन्हा चौका हाणला. या पद्धतीने एकही अधिकृत बॉल न होता 10 रन झाले. पुढचा बॉल परत नो बॉल होती आता भारतीय टीम च्या खात्यात शून्य बॉल 11 रन जमा झाले होते.

पुढील बॉल राणा नावेद ने डॉट बॉल टाकली आता भारतीय टीमच्या खात्यावर 1 बॉल 11 रन जमा झाले होते. पुढचा बॉल परत नो बॉल होता आणि सहवाग ने पुन्हा बॉल सीमेपार पाठवला. आता टीम इंडियाचा स्कोर 1 बॉल 16 रन झाला होता. त्याचा पुढचा बॉल परत नो बॉल होता पण त्याला सहवागने डॉट खेळला. राणा नावेदच्या या ओवर मध्ये 1 बॉल झाला होता आणि सहवागने 17 रन टीम स्कोर 17 केला होता. पुढच्या बॉल वर सहवाग ने चौका मारला.

अद्भुत आहे सहवाग चा रेकॉर्ड

या पद्धतीने वीरेंद्र सहवाग ने राणा नावेद उल हसन च्या 2 लीगल डिलीवरी खेळून 21 रन काढल्या. तुमच्या माहीतीसाठी राणा नावेद उल हसन याने या ओवर मध्ये एकूण 5 नो बॉल फेकले होते. राणा नावेदला या ओवर मध्ये एकूण 11 बॉल करावे लागले.


Show More

Related Articles

Back to top button