दुधा मध्ये खिसमिस उकळवून सेवन केल्याने दूर होतात हे रोग

मनुका म्हणजेच खिसमिस आयुर्वेद मध्ये एक औषधी मानली गेली आहे. आयुर्वेदामध्ये मनुके गळ्यासाठी सर्वश्रेष्ठ औषधी मनाली जाते. द्राक्ष विशिष्ट पद्धतीने सुकलेल्या नंतर त्यास मनुका किंवा खिसमिस असे म्हणतात. द्राक्षाचे सगळे गुण खिसमिस मध्ये असतात. खिसमिस दोन प्रकारचे असतात एक लाल खिसमिस आणि दुसरा काळा खिसमिस.

खिसमिस खाण्यामुळे रक्त वाढ होते आणि वायू दोष दूर होतो. यास खाण्यामुळे रक्त वृद्धी होते आणि वायू, पित्त, कफ दोष दूर होतो. चला आज आपण खिसमिस बद्दल जाणून घेऊ. आपण 5-10 खिसमिस रात्री पाण्यात भिजवून सकाळी यास पाण्यासह सेवन करू शकता. किंवा रात्री एक ग्लास दुधा मध्ये खिसमिस उकळवून त्याचे सेवन करू शकता. चला जाणून घेऊ रात्री किंवा सकाळी खिसमिस सेवन करण्यामुळे आपल्याला किती फायदे मिळू शकतात.

खिसमिस चे फायदे । Raisin’s Benefits

रक्त वाढ आणि रक्त शोधक : रात्री झोपताना 10 ते 12 खिसमिस धुवून पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्या नंतर खिसमिस मधील बीज काढून या मनुक्याना व्यवस्थित चावून खाण्यामुळे शरीरातील रक्त वाढ होते. यांच्या व्यतिरिक्त मनुका खाण्यामुळे रक्त स्वच्छ होते आणि नाकातून वाहणारे रक्त देखील बंद होते. मनुक्यांचे सेवन 2 ते 4 आठवडे केले पाहिजे.

मुलांना अंथरुणात लघवी करण्याची समस्या असल्यास : जे मुले रात्री अंथरुणात लघवी करतात, त्यांनी रात्री दोन मनुके बीज काढून रात्री एक आठवडा खाल्ली पाहिजेत.

सर्दी : सर्दी झाल्यावर सात मनुक्के रात्री झोपण्याच्या अगोदर बीज काढून दुधामध्ये उकळवून घ्यावे. एका खुराकानेच आराम मिळण्यास सुरुवात होईल. जर सर्दी जुनी असेल तर एक आठवडा उपाय करावा.

डोळ्यांची दृष्टी, नखे, सफेद दाग, गर्भाशय : डोळ्यांची नजर, नखे, सफेद दाग, महिलांना गर्भाशयाच्या समस्या असल्यास खिसमिस दुधा मध्ये उकळवून थोडेसे तूप आणि खडीसाखर पिण्यामुळे फायदा होतो.