Breaking News
Home / करमणूक / दुधावर भाकरी पेक्षा जाड मलाई किंवा साय आणण्यासाठी या पद्धतीने दूध गरम करा, आश्चर्यकारक परिणाम मिळेल

दुधावर भाकरी पेक्षा जाड मलाई किंवा साय आणण्यासाठी या पद्धतीने दूध गरम करा, आश्चर्यकारक परिणाम मिळेल

आपल्या पैकी अनेक लोक बाजारातून दूध आणल्यावर गरम करत असतील आणि दुधावर साय किंवा मलाई येत नाही किंवा अगदीच पातळ येते त्यामुळे हैराण होत असाल तर आज आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने दूध गरम करण्याची ट्रिक सांगत आहोत त्यामुळे भाकरी पेक्षा जाड दुधावर मलाई किंवा साय येण्याची शक्यता वाढणार आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे ही पद्धत.यासाठी आपण सगळ्यात पहिले ज्या भांड्यात दूध गरम करणार आहात ते पाण्याने आतून चारी बाजूने ओले करून घ्या. यामुळे दूध गरम करताना ते भांड्याला चिटकणार नाही किंवा बुडाला जळणार नाही. यानंतर आपण भांड्यामध्ये दूध ओतावे आणि मेडीयम आचेवर दूध गरम करण्यास ठेवावे.

लक्षात ठेवा गाईच्या दुधामध्ये फॅट कमी असते आणि म्हशीच्या दुधा मध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधाची साय किंवा ज्यास आपण मलाई म्हणतो ती जाड येते. तर गाईच्या दुधाची मलाई तुलनेने कमी जाड असते. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण सामान्य दुधा पासून देखील जाड मलाई काढू शकतो.आपल्याला जाड मलाई पाहिजे असल्यास आपण दूध नेहमी मध्यम आचेवर गरम करावे. मोठ्या आणि फास्ट गैस वर किंवा आचेवर दूध गरम केल्यास मलाई पातळ येईल. त्यामुळे दूध मध्यम आचेवर उकळी येई पर्यंत गरम करावे आणि त्यानंतर गैस एकदम स्लो करून 5 मिनिट एक्स्ट्रा उकळवावे. दूध अतिरिक्त गरम केल्यामुळे दुधा मधील बैक्टेरिया आणि व्हायरस नष्ट होतात.

यानंतर दूध गैस वरून खाली उतरवून जाळीदार झाकण झाकून दूध चार ते पाच तास थंड होऊ द्यावे. नंतर दूध फ्रिज मध्ये चार-पाच तास दूध फ्रिज मध्ये थंड होण्यास ठेवावे कारण दूध फ्रिज मध्ये थंड झाल्या नंतरच छान मलाई येते. पण लक्षात ठेवा दूध गरम केल्या नंतर त्यास जास्त हलवू नये किंवा ढवळू नये यामुळे मलाई जमण्यास अडथळा येतो.

चार ते पाच तास दूध फ्रिज मध्ये थंड झाल्या नंतर त्यास बाहेर काढावे आणि भांड्याच्या चारी बाजूने चमच्याने किंवा सूरी ने मलाई कापून नंतर झाऱ्याने मलाई दुधाच्या बाहेर काढावी. आपल्याला भाकरी पेक्षा जाड दुधावर मलाई असल्याचे दिसून येईल. ही मलाई आपण वेगळी फ्रिज मध्ये साठवून नंतर त्यावर प्रक्रिया करून तूप बनवू शकता.

About V Amit