astrology

मनोकामना पूर्ण करण्यासाठी करावे कोणते व्रत, नक्की वाचा

व्रत किंवा उपासना आपल्या जीवनात वेगळेच स्थान मिळवून आहे. व्रत किंवा उपासना करणे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टीने देखील महत्वाचे आहे. हिंदू धर्मात वेगवेगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे व्रत सांगितले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणते व्रत ठेवले पाहिजे? चला तर आज आपण याची माहीत घेऊ.

वैज्ञानिक दृष्टीने व्रत करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, तर दुसरीकडे शास्त्राच्या अनुसार मन शांती सोबत आत्मा कंट्रोल होतो. वेगवेगळ्या तिथी नुसार वेगवेगळे व्रत असतात. अश्यात तिथीनुसार ठेवलेले व्रत शरीराला निरोगी ठेवते, पण धार्मिक दृष्टीने व्रत हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जातात. असे मानले जाते की ज्या घरामध्ये व्रत ठेवले जाते त्या घरामध्ये नेहमी आनंद टिकून राहतो.

व्रत करण्या सोबत त्याचे काही नियम देखील असतात ज्याचे पालन करणे आवश्यक असते. पण अनेक लोकांना याबद्दल माहीती नसते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे माहीत असावे की तुम्ही कोणती मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्रत ठेवत आहात. त्यानंतर तुम्हाला माहीत असावे की ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणते व्रत ठेवले पाहिजे, ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपाय : हिंदू धर्मात प्रचलित असे कोण कोणते व्रत आहेत?

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की या व्रताला करण्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. सोबतच तुम्हाला आर्थिक समस्या कधीही येत नाहीत. नवरात्रीचे व्रत वर्षात दोन वेळा ठेवले जाते, यामुळे पूर्ण वर्ष तुम्ही निरोगी राहाल.

एकादशीचे व्रत देखील प्रचलित आहे. एकादशीचे व्रत केल्यामुळे मन शांत राहते. एवढेच नाही तर तुम्ही हे व्रत नियमित ठेवले तर तुम्हाला धन आणि आरोग्याची प्राप्ती होईल.

पोर्णिमा किंवा अमावास्याचे व्रत देखील अत्यंत प्रचलित आहे. हे व्रत केल्यामुळे हार्मोनची समस्या होत नाही. असे मानले जाते की हे व्रत केल्यामुळे तुम्हाला एक अदृश्य शक्ती प्राप्त होते.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्रत

चला तर आता पाहू की कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणते व्रत करावे. होय, प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे व्रत आहे.

मना सारखा जीवनसाथी मिळवण्यासाठी

 

सोमवारचे व्रत केल्यामुळे तुम्हाला मना सारखा जीवनसाथी मिळतो. सोमवारच्या दिवशी शिवलिंग वर बेल पत्र अर्पित करण्यासोबत पार्वती मंगल पाठ करावे. या दिवसी पार्वती आणि शंकराची पूजा करावी.

धन प्राप्ती आणि समृद्धीसाठी

घरा मध्ये माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी शुक्रवारचे व्रत केले पाहिजे. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. लक्षात असू द्या या दिवशी आंबट वस्तू चुकूनही खावू नये. सफेद रंगाच्या वस्तूचे सेवन करावे. माता लक्ष्मीस सफेद आणि लाल फूल अर्पण करावे.

सुख शांतीसाठी उपाय

सुख शांती मिळवण्यासाठी तुम्ही एकादशी आणि गुरुवारचे व्रत ठेवले पाहिजे. गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. पण या दिवशी मीठ आणि केळे खाणे टाळले पाहिजे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : खरच रात्रीच्या जेवणाच्या वेळेत दही खाऊ नये का?


Show More

Related Articles

Back to top button