Connect with us

से क्स करताना महिलांना काय नकोय…

Love

से क्स करताना महिलांना काय नकोय…

स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला आपल्या जीवनात काही लक्षात राहत असेल तर आयुष्यातील सगळ्यात पहिल्यांदा केलेला संभोग. त्यामुळे सेक्स करण्यापूर्वी महिलांना काय नको असतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.

जर तुम्हांलाही जाणून घ्यायचं असेल की काय करू नये तर पुढील काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

जबदरस्ती करू नका

जेव्हा आपण आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्याचा विचार करत असाल मात्र, तुम्ही तिच्या शरीराला स्पर्श केल्यास तिला जर आवडत नसेल तर थोडा वेळ थांबा. कारण तुम्ही जबरदस्ती केल्यामुळे तुमची जोडीदार समाधानी होणार नाही.

मोबाईल फोन बंद ठेवा

ज्यावेळी आपण आपल्या जोडीदारासोबत असता त्यावेळी संपुर्ण वेळ तिलाच द्या. उगीचच फोन चालू ठेवल्यास ती तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. (हे पण वाचा: पहिल्यांदा ‘सेक्स’ करताना या गोष्टींची घ्या काळजी)

उगीचच काही तरी संगीत लावू नका

गाण्यांमुळे आपला मूड क्षणात बदलू शकतो. पण लक्षात ठेवा की आपल्या जोडीदाराला आवडणारे संगीत, गाणे नसेल तर कामक्रिडेत व्यतत्य येऊ शकतो.

चुंबन करण्याची कला

या गोष्टीला काही महत्त्व नाही की एखादा पुरूष खूप सुदंर दिसतो की नाही, जर का तुम्ही नीट चुंबन नाही घेऊ शकलात तर मात्र महिला नाराज होतात. चुंबन किंवा किस करत असताना उगीचच आपल्या जोडीदाराच्या जीभेला किंवा ओठाला चावू नये. (हे पण वाचा: ‘वुमन ऑन टॉप’ सेक्स पोजीशन ठरू शकते पुरूषांसाठी जीवघेणी)
उगीचच घाई करू नका

महिलांना शारीरिक संभोगाला तयार होण्यासाठी काही वेळ द्यावा. त्यासोबतच तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाचे दोन शब्द बोला, तिला एखादं चुंबन घ्या आणि त्यानंतर संभोग करण्यास सुरुवात करा. जर का तुम्ही तुमच्या जोडीदाराला समाधानी करू शकला नाहीत तर त्या अत्यंत नाराज होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला नेहमी समाधानी करण्याचा प्रयत्न करा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top