Food
लिंबू आणि जीरा यांचे हे मिश्रण वाढलेल्या वजनासाठी काळ आहे. असा करा वापर
अनेक लोकांना वाढलेल्या वजनाचा त्रास होत आहे. वाढलेले हे वजन कमी करण्यासाठी लोक भरपूर पैसे खर्च करतात आणि अनेक पद्धती वापरून पाहतात पण बऱ्याचदा याचा काही फायदा होत नाही. पण आज आम्ही जो उपाय तुम्हाला सांगत आहोत तो वाढलेल्या वजनासाठी काळ ठरेल.
अतिक्षय सोप्पा आणि साधारण दिसणारा हा उपाय फक्त काही दिवसात आपला परिणाम दाखवून देईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा उपाय अतिक्षय सोप्पा आहे. चला पाहू काय आहे हा उपाय.
आवश्यक साहित्य :
अर्धा लिंबू
एक चमचा जीरा
एक चमचा मध
कृती आणि खाण्याची पध्दत :
दररोज रात्री एक चमचा जीरा स्वच्छ पिण्याच्या पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे जीरे चावून खावे आणि उरलेले पाणी चहा प्रमाणे गरम करावे आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करावा आणि यामध्ये एक चमचा मध टाकून मिक्स करून चहा प्रमाणे प्यावे.
जीरे आणि लिंबू यांचे मिश्रण घेण्याचे कारण :
जीरा शरीरात आपल्या कडून खालल्या गेलेले फैट शरीरात जमा होऊ देत नाही आणि गरम पाण्यात लिंबू रस चरबीला कमी करते. यामुळे हा उपाय वाढलेल्या वजनासाठी चमत्कारीक फायदा देतो.
कृपया हे लक्षात ठेवा :
हा प्रयोग / उपाय करत असताना नाश्ता करू नये. नाहीतर मनासारखा परिणाम दिसून येणार नाही. सकाळी हा उपाय केल्यानंतर सरळ दुपारचे जेवणच खावे. मुख्य जेवण जेवणा अगोदर एक प्लेट सलाड खावे आणि भोजना मध्ये हिरव्या भाज्यांचा वापर करावा. रात्रीचे भोजन झोपण्याच्या 2-3 तास अगोदर करावे.दुपारी आणि रात्रीच्या भोजना नंतर एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून चहा प्रमाणे प्यावे. भोजन करताना थंड पाणी कदापी पिऊ नये.
पथ्य काय पाळावीत
मैद्या पासून बनलेल्या वस्तू खाऊ नये. साखर आणि मीठ वाढलेल्या वजनासाठी विषा सारखे असते त्यामुळे ते कमी खावे. गव्हाच्या पिठातील कोंडा काढू नये त्यासोबतच पोळ्या / चपात्या बनवाव्यात. फळांचा ज्यूस पिण्या एवजी फळे खावीत यामुळे फाईबर मिळते आणि लवकर भूक लागत नाही.
लवकर परिणाम दिसण्यासाठी या उपाया सोबत व्यायाम देखील केला पाहिजे. विशेष करून कपालभाती, पश्चीमोत्तनासन आणि जमल्यास जॉगिंग किंवा रनिंग करावे.
तुम्हाला एका महिन्यात परिणाम दिसून येईल.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : वजन कमी करण्याचे प्रभावी उपाय
