People

जगातला 90 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा मोठा देश आहे रामायणाच्या प्रेमात, रामाला मानतात आपला नायक जाणून घ्या या देशा बद्दल..

रामायण हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. भारतातील जवळपास सर्व लोक रामायणातील गोष्टीं माहीत आहेत श्रीराम यांना हिंदू धर्मामध्ये मानाचे स्थान आहे आणि देशातील सर्व हिंदू भगवान श्रीराम यांची पूजा करतात. दर वर्षी देशात रामलीला मोठ्या उत्साहात सादर केली जाते. पण काय तुम्हाला माहीत आहे का की रामायण फक्त भारता मध्येच प्रसिध्द नाही तर अजून बरेच देश आहेत ज्यांची रुची रामायणा मध्ये आहे आणि तेथे ही भगवान श्रीराम यांची पूजा होते. चला जाणून घेऊया हा देश कोणता आहे.

इंडोनेशिया मध्ये होते भगवान श्रीरामाची पूजा

हा एक मुस्लिम देश आहे जेथे सर्वात जास्त मुस्लिम लोक राहतात. पण मुस्लिम देश असून देखील या देशात रामायण पवित्र मानले जाते. हा देश दक्षिण पूर्व आशियात आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 28 करोड आहे. येथील सरकार ने 1973 मध्ये आंतरराष्ट्रीय रामायण सम्मेलन आयोजित केले होते. हे एक भव्य आयोजन होते ज्यामध्ये लोकांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेतला होता ज्यामुळे लोकांना रामायणाच्या विशेषता समजल्या आणि येथील लोक रामायणाला पवित्र मानू लागले आणि पूजा करू लागले. भारता प्रमाणे इंडोनेशियासाठी देखील हा एक विशेष ग्रंथ आहे.

भारत आणि इंडोनेशियाच्या रामायणा मध्ये काय फरक आहे

श्रीराम यांचा जन्म भारतातील अयोध्या मध्ये झाला होता पण तुम्हाला आश्चर्य होईल की इंडोनेशिया मध्ये पण एक असे स्थान आहे ज्याला लोक “योग्या” नावाने ओळखतात. आपल्या आणि इंडोनेशियाच्या रामायण मध्ये थोडेफार अंतर आहे येथील लोक रामकथेला ककनिन किंवा “काकावीन रामायण” नावाने ओळखतात. भारता मध्ये रामायणाचे रचनाकार आदिकवी ऋषी वाल्मिकी आहेत, तर इंडोनेशिया मध्ये याचे रचनाकार कवी योगेश्वर आहेत. इतिहासकार सांगतात याची रचना 9 व्या शतकात झाली होती. भारतात रामायण संस्कृत भाषेत लिहिलेले आहे तर इंडोनेशिया मध्ये याची रचना “कावी” भाषेत झाली आहे.

इंडोनेशिया मध्ये सीता मातेस “सिंता” असे बोलले जाते. येथे नौ सेनेच्या अध्यक्षाला लक्षमण बोलतात. हनुमान हे इंडोनेशिया मधील सर्वात लोकप्रिय पात्र आहे. येथील लोक हनुमानाला जास्त पसंत करतात इंडोनेशिया मध्ये हनुमान अत्यंत लोकप्रिय आहे.

90 टक्के मुस्लिम लोकसंख्यावाल्या देशात 27 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात राजधानी जकार्ताच्या रस्त्यावर युवक हनुमानाचा वेशभूषा करून सरकारी परेड मध्ये सहभागी होतात. हनुमानास इंडोनेशिया मध्ये “अनोमान” बोलले जाते. येथे रामायण शालेय शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हिंदू धर्मा नुसार महिलेचा कोणता अंग सर्वात पवित्र मानला जातो, तुम्हाला माहीत आहे का?


Show More

Related Articles

Back to top button