पुन्हा एकदा लग्न करणार बॉलीवूड एक्ट्रेस करिश्मा कपूर, या व्यक्ती सोबत होऊ शकतो विवाह

करिश्मा कपूर 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री होती. तिचा पहिला चित्रपट ‘प्रेम कैदी’ होता. 90 च्या दशकातील करिश्माचे बॉलीवूड वर वर्चस्व होते. ती त्यावेळीची सुंदर आणि उत्तम ऐक्ट्रेस होती. सगळे तिच्या सोबत काम करण्यास इच्छुक असायचे. त्यावेळी करिश्मा कपूर ने अनेक हिट फिल्म केल्या. तिची जोडी गोविंदा सोबत जास्त पसंत केली गेली. गोविंदा आणि करिष्मा यांनी अनेक सुपरहिट फिल्म प्रेक्षकांना दिल्या. करिश्मा ने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूड मध्ये आपली ओळख निर्माण केली. पण लग्न केल्या नंतर ती बॉलिवूड पासून दूर गेली. परंतु अधूनमधून ती काही फिल्म आणि टीव्ही शो मध्ये दिसून आली.

2003 मध्ये संजय कपूर सोबत केले होते लग्न

करिष्मा कपूर ने 2003 मध्ये बिजनेसमैन संजय कपूर सोबत लग्न केले होते, पण तिचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकले नाही आणि काही वर्षांनी ते वेगळे झाले. पती पासून वेगळी झाल्या नंतर तिचे दोन्ही मुलं तिच्या सोबतच असतात. आणि सिंगल मॉम बनून ती त्यांना सांभाळते.

पुन्हा विवाह बंधनात अडकू शकते करिष्मा

अश्या बातम्या येत आहेत कि करिष्मा लवकरच पुन्हा विवाह करू शकते. बातम्यांच्या अनुसार, करिष्मा हल्ली संदीप तोषनीवाल यास डेट करत आहे आणि लवकरच त्याच्या सोबतच लवकरच लग्न करू शकते. संदीप तोषनीवाल एक मोठे उद्योजक आहे आणि ते एकमेकांना दीर्घकाळापासून डेट केल्या नंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय कपूर प्रमाणे संदीप तोषनीवाल हा देखील घटस्फोटित आहे. त्याने हल्लीच पत्नी हर्षिता सोबत घटस्फोट घेतला आहे. अनेक वेळा संदीप आणि करिष्मा यांना एकत्र पाहिले गेले आहे.

फिल्म पासून दूर असली तरी करिष्मा आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. करिष्मा ने स्वतःला फिट ठेवले आहे. 45 वर्ष वय झाल्या नंतर देखील ती अजूनही तरुण दिसते. ती नेहमी आपले ग्लैमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यास फैन्स पसंत करतात.