viral

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस? कशी झाली सुरुवात

आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच 8 मार्च यादिवशी जगातील सर्व देश मंग ते विकसित असो किंवा विकासशील सर्व मिळून महिला अधिकाराच्या गोष्टी करतात. महिला दिवसाच्या दिवशी महिलांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारावर चर्चा केली जाते. सोबतच महिलांच्या विकासासाठी वेगवेगळे मार्ग कोणते आहेत यावर देखील चर्चा होते. तर अश्या या महिला दिवसा बद्दल आज अधिक माहीती जाणून घेऊ या.

सुरुवात कशी झाली

19 व्या शतकात महिलांनी आपल्या अधिकारा बद्दल जागरुकता दाखवण्यास सुरुवात केली होती. आपल्या अधिकाराच्या बद्दल ते कुजबुज करू लागले होते. 1908 मध्ये 15000 स्त्रियांनी आपल्यासाठी मताधिकार मागितला. सोबतच त्यांनी आपल्या चांगल्या वेतनासाठी आणि कामाचे तास कमी करण्यासाठी मार्च काढला. यूनाइटेड स्टेट्स मध्ये 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस बनवण्याचा विचार सर्वात पहिले जर्मनीच्या क्लारा जेडकिंट यांनी 1910 मध्ये मांडला. त्या म्हणाल्या जगामध्ये प्रत्येक देशातील महिलांना आपले विचार मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस बनवण्याची योजना केली पाहिजे. त्या प्रमाणे एक संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 17 देशाच्या 100 महिलांनी सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यावर सहमती दर्शवली. 19 मार्च 1911 मध्ये आस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्विट्जरलैंड मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1913 मध्ये यास 8 मार्च केले गेले. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने पहिल्यांदा 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला.

आजच्या संस्कृती मध्ये

आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या निमित्ताने काही देशांमध्ये सुट्टी जाहीर केली जाते. सुट्टी घोषित देशामध्ये अफगानिस्तान, अंगोला, बेलारूस, कजाकिस्तान इत्यादि शामिल आहेत. याच सोबत काही देश असे आहेत जेथे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने फक्त महिलांना सुट्टी असते या मध्ये चीन, नेपाल, मकदूनिया आणि मेडागास्कार शामिल आहेत. याच सोबत काही देश असेही आहेत जे 8 मार्चला सुट्टी देत नाहीत पण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. चिली, बुलगारिया, रोमानिया, क्रोशिया आणि कैमरून हे ते देश आहेत. येथील लोक आपल्या आयुष्यात असलेल्या महिलांना वेगवेगळे गिफ्ट देतात.

भारता मधील आंतरराष्ट्रीय महिला दिवस

भारता मध्ये पण आंतरराष्ट्रीय महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या सन्मानार्थ वेगवेगळे समारोहाचे आयोजन केले जाते. सोबतच समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते. स्त्रियांच्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना या दिवशी वेगवेगळे प्रशिक्षण शिबीर आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करतात. अनेक संस्थांकडून गरीब महिलांना आर्थिक मदत घोषित केली जाते.

भारता मध्ये महिलाका विविध अधिकार, मतदान अधिकार आणि शिक्षा अधिकार प्राप्त आहेत. आज भारता मध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला काम करत नाहीत. मेडिकल, फिल्म, इंजिनियरिंग इत्यादी सर्व क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुमच्या लघवीला फेस येत आहे का? जर उत्तर होय असेल तर सावधान, कारण जीव धोक्यात टाकत आहात तुम्ही


Show More

Related Articles

Back to top button