entertenment

पांड्या ब्रदर्स फक्त एवढ्या ओव्हर्सचे बॉलर्स आहेत, आज नाहीतर भविष्यात होईल जाणीव : मांजरेकर

रविवारी खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय बॉलरची जोरदार धुलाई झाली. हैमिल्टन मध्ये खेळलेल्या या शेवटच्या मैच मध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पांड्या ब्रदर्सच्या गोलंदाजीवर भरपूर रन लुटले. दोन्ही भावांनी मिळून आठ ओव्हर मध्ये एकूण 98 रन दिले.

पांड्या ब्रदर्सच्या खराब गोलंदाजी वर टीम इंडियाचे पूर्व क्रिकेटर आणि कमेंटेटर संजय मांजरेकर चांगलेच भडकले. मांजरेकर यांनी पांड्या ब्रदर्स फक्त दोन ओव्हरीचे गोलंदाज असल्याचे म्हंटले. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले ‘जर आज नाही, तर लवकरच जाणीव होईल कि पांड्या ब्रदर्स फक्त 2 ओव्हरचे गोलंदाज आहेत. आणि होय, ते फक्त एका चांगल्या दिवशीच इंटरनेशनल टी -20 मध्ये 4 ओव्हर करू शकतात.’

रविवारच्या मैच मध्ये मोठा भाऊ कृणाल पांड्या ने या मैच मध्ये भरपूर रन उधळले. मागील मैच मध्ये तीन विकेट घेऊन मैन ऑफ द मैच ठरलेल्या कृणाल ने या मैच मध्ये चार ओव्हर मध्ये 54 रन देऊन एकही विकेट मिळवता आली नाही. तर शेवटच्या ओव्हर मध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देता आला नाही. कृणाल पांड्या 26 रन बनवून नाबाद राहिला.

तर लहान भाऊ हार्दिक पांड्याला देखील चार ओव्हर मध्ये 44 रन देऊन एकही विकेट मिळवता आली नाही. पण त्याने फलंदाजी मध्ये 11 बॉल मध्ये 21 रन बनवले.

तुमच्या माहितीसाठी तीन मैचच्या सिरीज मध्ये दोन्ही भाऊ महागडे ठरले. हार्दिक ने 3 मैच मध्ये 12 ओव्हर बॉलिंग केली ज्यामध्ये त्याने 131 रणांची उधळण करून 3 विकेट मिळवले तर कृणाल पांड्याने 12 ओव्हर मध्ये 119 रन खर्च करून 4 विकेट घेतले.

Tags

Related Articles

Back to top button