money

आपले किती पैसे कोठे गुंतवणूक कराल त्यासाठी कोणती काळजी घ्यावी

प्रत्येक व्यक्तीची आर्थिकस्थिती नेहमी चांगलीच राहते किंवा भविष्यात चांगली राहील याची गैरेंटी कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या पैश्याचे योग्य नियोजन, वापर आणि संरक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे. आपल्याला पैसे कमावण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याहूनही जास्त मेहनत ते आपल्या जवळ टिकवून ठेवण्यासाठी करावी लागते असे बोलल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

आपल्याला पैसे कमावण्यासाठी मेहनत आणि योग्य ठिकाणी तण, मन आणि धन हे गुंतवले तर पैसे आपण कमवू शकतो मंग ती नोकरी असो किंवा बिजनेस. पण जसजसे आपण पैश्यांचा संचय करत जातो आणि आपली आर्थिकस्थिती मजबूत करत जातो तसतशी आपली जबाबदारी देखील वाढते. या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव तुम्हाला असेलच किंवा जर नसेल तर आज त्याबद्दल आपण येथे थोडी चर्चा करू.

तुम्हाला कल्पना असेलच कि जशी आपली आर्थिकस्थिती सुधारते किंवा सुधारलेली असते तेव्हा आपल्याकडे अनेक लोक मंग ते बँक ऑफर, इन्शुरन्स, जागा जमीन बद्दल ऑफर घेऊन अनेक लोक आपल्या समोर येत असतात जेणे करून आपल्याकडे जमा असलेला पैसा त्यांच्याकडे जमा व्हावा हा त्यांचा निव्वळ हेतू असतो त्यासाठी ते आपल्याला अनेक फायद्याचे आमिष दाखवतात. परंतु हे फायदे जरी खरे असले तरी आपण आपल्यासाठी एक नियम करून ठेवला पाहीजे तो म्हणजे आपल्या कडून दुसऱ्याला दिलेली रक्कम म्हणजेच मुद्दल कधीही बुडणार नाही आणि आपल्याला हवी तेव्हा ती आपल्यासाठी उपलब्ध असेल. होय यासाठी काही अपवाद असू शकतात ते आपण पुढे पाहू.

आपण गुंतवलेली मुद्दल नेहमी सुरक्षित राहील या नियमा सोबत कधीही तडजोड केली नाही पाहिजे पण आपली मुद्दल किंवा पैसे जर आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी वेळ द्यावाच लागतो त्यामुळे मुद्दल कधीही आपल्यासाठी उपलब्ध होईल या नियमा सोबत तडजोड केली तरी चालेल पण त्यातही आपले सगळे पैसे अश्या योजनेत गुंतवणे नक्कीच टाळेल पाहिजे अश्या योजनेत तेच पैसे गुंतवले पाहिजेत ज्या पैश्यांची आपल्याला पुढील दीर्घकाळासाठी गरज नाही आणि ते दीर्घकाळ उपलब्ध झाले नाही तरी चालतील. पण तरीही ते बुडणार नाहीत याची काळजी घ्यायलाच पाहिजे कारण पैसे कमावण्यासाठी आपण मेहनत घेतलेली आहे हे कधीही विसरू नये आणि ही मेहनत एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे बुडणार नाही याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

सगळ्यात शेवटी जर आपल्याला पैसे कसे मैनेज करायचे ज्यामुळे त्यांच्यावर रिक्स होणार नाही आणि पैश्याने पैसे देखील कमावता येतील असा काही मार्ग शोधायचा असेल तर एखाद्या हुशार व्यक्ती कडून सल्ला नक्की घ्या. आता ही हुशारी पैश्यांच्या बद्दल असली पाहिजे आणि त्याने स्वता प्रत्यक्ष त्यामध्ये यश मिळवलेले असले पाहिजे. म्हणजे आपला केस कापणारा हुशार आहे म्हणून त्याच्या कडून पैसे कसे मैनेज करावेत याचा सल्ला घेणे मूर्खपणाचे ठरेल कारण त्याच्याकडे फक्त केस आणि दाढी कसे कापावी याची हुशारी असू शकते आणि त्यामध्येच त्याला प्रत्यक्ष अनुभव देखील आहे पण पैश्यांच्या बाबतीत तो तेवढाच हुशार असेल हे निश्चित पाने सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्या गुरुची निवड थंड डोक्याने आणि काळजीपूर्वक करा.

Show More

Related Articles

Back to top button
Close