health

झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय

झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय : कोकरोच म्हणजेच झुरळे ही प्रत्येक घरातील समस्या आहे. घरातील किचनमध्ये झुरळ असल्याचे अनेक घरामध्ये पाहण्यास मिळते. आज आपण यावर उपाय पाहणार आहोत. ज्यामध्ये काही घरगुती साहित्याचा वापर करून आपण झुरले पळवण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.

झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय

तेज पत्ता आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून अनेक पदार्था मध्ये वापरतो. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की तेज पत्ता झुरळ पळवण्यासाठी देखील उपयोगी आहेत. यासाठी तुम्ही काही तेज पत्ता घ्या आणि त्यांना क्रश (तुकडे) करून जेथे झुरळांचा वावर आहे तेथे ठेवा. तेज पत्ता आपल्या तीव्र गंधामुळे झुरळांना पळवून लावेल. तेज पत्ता जेवढा स्ट्रोग स्मेल असलेला असेल तेवढ्या लवकर झुरळ पळून जातील.

पुढील उपायांमध्ये तुम्हाला एक कांदा आणि एक लसून मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे त्यामध्ये एक मोठा चमचा काळी मिरी पावडर मिक्स करा त्यानंतर यामध्ये 200 मिली पाणी मिक्स करा. हे मिश्रण एक तास तसेच राहू द्या. एक तासा नंतर यामध्ये एक मोठा चमचा लिक्विड सोप मिक्स करा. त्यानंतर तयार झालेल्या मिश्रणास झुरळ असलेल्या जागी स्प्रे करावा.

तिसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोर्न स्टार्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस आवश्यक आहे. हे दोन्ही साहित्य सम प्रमाणात मिक्स करा आणि झुरळ असलेल्या जागी टाका.

चवथा उपाय बॉरेक्स पावडर झुरळ असलेल्या जागी टाकल्याने झुरळ पळून जातात.

या पुढील उपाय करण्यासाठी तुम्हाला लिस्टरीन माउथ वॉश आणि पाणी सम प्रमाणात घ्यायचे आहे त्यामध्ये थोडे लिक्विड सोप मिक्स करावे आणि झुरळ असलेल्या जागी स्प्रे करावे.

सहावा उपाय करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पिठीसाखर सम प्रमाणात घ्या आणि एकत्र करा. हे मिश्रण रात्री जेथे झुरळ येतात तेथे टाकावी. हे साखर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण असल्याने साखर झुरळांना आकर्षित करेल त्यामुळे झुरळ ते मिश्रण खातील आणि मरून जातील.

झुरळ काळोखा मध्ये आणि घाणेरड्या जागी राहणे पसंत करतात त्यामुळे तुम्ही आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि घर मोईश्चर फ्री ठेवा, कचऱ्याचा डब्बा घराच्या बाहेरच ठेवा. घरामध्ये कोठेही पाणी गळत असेल तर ते त्वरित बंद करा, अन्न नेहमी एयर टाईट डब्यात ठेवा या छोट्या ट्रिक्स वापल्यास झुरळ तुमच्या घरात येणार नाहीत.

झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती मिळवण्यास आवडेल हे कमेंट मध्ये लिहा आणि पोस्ट / पेज लाईक करा.


Show More

Related Articles

Back to top button