foodhealth

सतत नख तुटण्यामुळे हैरान झाला असाल तर करा हे घरगुती उपाय

सुंदर नखे असावीत असे सर्वांना वाटते. पण कमजोर होऊन तुटणारी नखे तुमच्या हाताचे सौंदर्य बिघडवते तर सोबतच तुम्हाला इजा देखील करू शकते. महिला आणि पुरुष दोघांना ही समस्या समान असते. नखे कमजोर नाजूक होण्याची अनेक कारणे असू शकतात. वाढते वय, दीर्घकाळ नेल पॉलिश लावून ठेवणे आणि सतत पाण्याच्या संपर्कात नखांना ठेवणे इत्यादी नखे तुटण्याची सामान्य कारणे असू शकतात. पण या समस्ये पासून वाचण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. चला पाहुया नखे तुटण्या पासून वाचवणारी काही घरगुती उपाय.

खोबरेल तेल : खोबरेल तेल हे नखांना आवश्यक असलेले पोषण देण्यासाठी फायदेशीर आहे. हे नाजूक झालेल्या नखांना पुन्हा चांगले बनवतात ज्यामुळे ते तुटण्याची थांबतात. सोबतच नखांना संक्रमणा पासून वाचवते.

कसा करावा वापरा

गरम खोबरेल तेलाने नखांची मालिश करा.

रोज 10 मिनिट मालिश केल्यामुळे ब्लड-सर्क्युलेशन ठीक होते आणि नखे मजबूत होतात.

विटामिन E चे तेल

विटामिन E नखांना मजबूत आणि हाइड्रेट करतात आणि नखे तुटण्या पासून वाचवते.

कसे करावे वापर

खोबरेल तेलामध्ये विटामिन E चा कैप्सूल मिक्स करा.

या तेलाने नखांची मालिश करा.

हे रोज वापरा.

मीठ : मीठ आपल्या नखांचे आरोग्य वेगाने सुधारते. हे नखांना मजबूत पण करतात.

कसा करावा वापर

2 चमचे मीठ गरम पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये नखे बुडवावी.

यामध्ये 2 थेंब लेमन एसेंशियल ऑयल मिक्स करून 10 मिनिट नखे यात बुडवावी. हात स्वच्छ करून क्रीम लावावी.

लिंबाचा रस : लिंबाचा रसा मध्ये विटामिन सी असते यामुळे ते नखांना अतिशय उपयोगी असते. यामुळे तुमचे नखे तुटण्या पासून वाचतात आणि सुंदर होतात.

कसा करावा वापर

एक चमचा लिंबू रस ऑलिव ऑयल मध्ये मिक्स करून ते गरम करावे आणि काही वेळ नखे यामध्ये बुडवावीत.

आता या मिश्रणाने मालिश करा आणि रात्रभर असेच ठेवा. सकाळी धुवून टाका.

बीयर : बीयर मध्ये पुरेश्या प्रमाणात सेलेनियम, पोटेशियम, फॉस्फोरस आणि बायोटिन असते. यामुळे हे नखांना निरोगी आणि मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते.

कसा करावा वापर

2 चमचे ऑलिव ऑयल गरम करून थोडेसे एप्पल साइडर विनेगर मिक्स करा.

या मिश्रणा मध्ये अर्धा कप बीयर मिक्स करून नखांना यामध्ये 15 मिनिट बुडवून ठेवा आणि नंतर हात धुवून घ्या.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 2 वेळा डाळींबाचा उपयोग सांगितलेल्या पद्धतीने केला तर मुळव्याध बरी होऊ शकतो


Show More

Related Articles

Back to top button