entertenment

फक्त 25 + 5 रुपयात वाढवा पंख्याचा स्पीड, घरीच करू शकता हे काम

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि आता वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्यातच जर तुमचा पंखा जुना असेल तर तो कमी वेगाने फिरत आहे आणि हवा येत नाही असे वाटणे सहाजिक आहे. पण यावर उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि यासाठी खर्च देखील अत्यंत कमी आहे.

पंख्याचा स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला दोन कामे करावी लागतील एका कामासाठी तुम्हाला जवळपास 25 रुपये खर्च येईल तर दुसऱ्या कामासाठी 5 रुपये खर्च येईल. 25 रुपयाचे काम करण्यासाठी तुम्हाला पंखा खाली उतरवण्याची गरज नाही पण जे 5 रुपयावाले काम आहे त्यासाठी तुम्हाला पंखा खाली काढावा लागेल. चला पाहू नेमके कोणते काम केल्यास पंख्याचा वेग वाढेल.

बदलावे लागेल कंडेंसर

पंख्याच्या वरील प्लास्टिकच्या कव्हर मध्ये कंडेंसर असते. कंडेंसरमुळे करंट सरळ पंख्याच्या मोटर मध्ये जात नाही. कंडेंसर त्यास कंट्रोल करते. पण याच्या माल फंक्‍शनिंग मुळे पंख्याला पुरेशी वीज मिळत नाही आणि त्याचा वेग कमी होतो. याची किमत जवळपास 25 रुपये आहे. यास तुम्ही स्वता बदलू शकता.

कंडेंसर बदलण्या अगोदर त्याचा एक फोटो काढून ठेवा कारण कधीकधी कंडेंसर काढल्या नंतर पुन्हा नवीन लावताना कोणती वायर कोठे जोडावी हे विसरल्यामुळे गोंधळ होऊ शकतो त्यामुळे अगोदर फोटो काढून ठेवणे योग्य राहील. कंडेंसर बदलण्यासाठी त्याच क्षमतेचा कंडेंसर बाजारातून नवीन आणावा आणि फोटो पाहून पुन्हा नवीन कंडेंसरची जोडणी करावी.

बैरिंग लावा ग्रिस

पंख्याच्या खाली बॉल बेरिंग असते. जर यामध्ये ग्रीस कमी असेल तर याचा परिणाम पंख्याच्या वेगावर पडतो. बैरिगवर ग्रीस लावणे देखील सोप्पे आहे. पण यासाठी तुम्हाला पंखा जमिनीवर घ्यावा लागेल. त्यानंतर पंख्याचे सर्व नट उघडून मोटर वेगळी करा. पंख्याच्या आउटर लेयर मध्ये बेरिंग असते. यामध्ये तुम्ही बोटाने किंवा इतर कोणत्या वस्तूने ग्रीस लावू शकता. बॉल बेरिंग बाहेर काढण्याची गरज नाही. लक्षात ठेवा ग्रीस जुने नसावे कारण जुने ग्रीस हार्ड होते.

सावधान : विजेच्या उपकरणाचे काम करण्याआधी वीज प्रवाह खंडित करावा. तसेच पंख्याच्या कंडेंसर मध्ये वीज प्रवाह खंडित केल्या नंतरही शॉक लागू शकतो कारण कंडेंसर मध्ये वीज साठलेली असते त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.


Show More

Related Articles

Back to top button