Connect with us

कोणत्याही सांधेदुखीवर करा हे घरगुती रामबाण उपाय

Health

कोणत्याही सांधेदुखीवर करा हे घरगुती रामबाण उपाय

वाढत्या वयानुसार सांधेदुखीचा त्रास होतो. आणि हिवाळ्यात हा त्रास अधिक जाणवतो.

हल्ली हा जॉईंट पेनचा त्रास फक्त ज्येष्ठांनाच नाही तर तरूणांना देखील होताना दिसतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.

 

सेंधव मीठ

सेंधव मिठाचा प्रयोग हा दुखण्यावर रामबाण उपाय म्हणून आधी पासून चालत आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅगनेशियम आणि सल्फेट असते, जो मसल्सचे दुखणे कमी करून तुम्हाला दुख्ण्यापासून आराम देते. कोमट अंघोळीच्या पाण्यात २ कप सेंधव मीठ टाकावे व २० मिनिटांकरिता मुरु द्यावे. हे पाणी आपल्या टॉवेल वर टाकून तो टॉवेल आपल्या दुखण्यावर काही वेळाकरिता ठेवावा. वाटल्यास तुम्ही लवेंडर चे तेल देखील यात टाकू शकता.

गरम आणि थंड पॅक्स

जर तुम्हाल लगेच जॉईंट पेन पासून आराम हवा असेल तर हे दोन्ही पॅक्स तुमच्याकरिता उत्तम राहतील. तुम्ही यावर आईस पॅक किंवा गरम कपड्याचा शेक देखील देवू शकता, १५ मिनिटांकरिता हि प्रक्रिया केल्यास भरपूर आराम तुम्हाला जाणवेल. प्रत्येक दिवशी याने शेका यामुळे तुमच्या दुखण्यावरील सूज व दुखणे दोन्ही कमी होईल.

दररोज व्यायाम

रोज व्यायाम करणे हिवाळ्यात फार महत्वाचे आहे. यामुळे आपल्या शिरा मोकळ्या होतात, शिरामध्ये तणाव असल्यास मोठा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज हलका व्यायाम करणे, थोडे जॉगिंग करणे फार महत्वाचे आहे. योग देखील याकरिता फार उत्तम ठरेल.

डायट असावा चांगला

जॉइंट पेन चा त्रास न होण्याकरिता सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे चांगला डायट. चांगला डायट असल्यास आपल्या हाडांना विटॅमिन मिळते व त्यामुळे जॉइंट पेनची समस्या उद्भवत नाही. तुमच्या डायट मध्ये फ्रेश फूड, हिरव्या भाज्या तसेच फिश आणि वॉलनट असणे फार गरजेचे आहे हेच हेल्दी डायट आहे.

थोडक्यात घरगुती उपाय

सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राही पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिळेल. सांध्यावरील सूज कमी होऊन वेदना कमी होतात.

निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात. जर सांधा दुखत असेल तर मूठभर ओवा एरंडेल तलावर गरम करून सुटी कापडात बांधून पुरचुंडी करावी व त्याने दुखाणार सांधा शेकावा.

सांधा सुजला असेल व वेदना होत असतील तर सूज व वेदना कमी करण्यासाठी एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.

रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.

अशक्तपणा मुले सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो. रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही.

तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : रोज सकाळी पाण्यात मिसळून प्यावी एक वस्तू जी दूर करेल रक्ताची कमी, एसिडीटी, डायबिटीज आणि सांधेदुखी

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top