Connect with us

5 आरोग्यदायी फायदे मिळतात कडूलिंबाचे पाणी दररोज सांगितलेल्या पद्धतीने पिण्यामुळे

Food

5 आरोग्यदायी फायदे मिळतात कडूलिंबाचे पाणी दररोज सांगितलेल्या पद्धतीने पिण्यामुळे

कडुलिंब आरोग्यासाठी फायदेशीर असतो हे तुम्ही अनेक वेळा वाचले आणि ऐकले असेल. कडूलिंबा मध्ये एंटी-बैक्टीरियल आणि एंटी-फंगल गुण असतात यामुळे कडुलिंब संक्रमणाचा धोका कमी करतो. कडुलिंबाचे पाणी पिण्यामुळे बैक्टीरिया, फंगस, वायरस, परजीवी इत्यादींच्या संक्रमणाचा धोका अत्यंत कमी होतो सोबतच इम्यून सिस्टम बुस्ट होतो. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करणे देखील फायदेशीर असते. चला पाहू दररोज जर तुम्ही कडूलिंबाचे पाणी सेवन केले तर काय फायदे होतील.

कडुलिंबाचे पाणी सेवन केल्याने होणारे फायदे

पोट साफ होते : दररोज कडूलिंबाचे पाणी पिण्यामुळे आतडे आणि पोट यामधून टोक्सिंस निघून जातात यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाचे पाणी सेवन केल्याने पोट साफ होते. कडूलिंबा मध्ये असलेले एंटी-बैक्टीरियल गुण पोटातील किडे संपवण्यास मदत करतो.

त्वचेसाठी फायदेशीर : कडुलिंबाचे पाणी सेवन केल्यामुळे त्वचे संबंधी समस्या होत नाहीत. आयुर्वेदा मध्ये कडूलिंब प्राचीन काळापासून वापरला जात आहे. कडूलिंबाचे पाणी सेवन केल्याने एक्जिमा, मुरुमे आणि खाजखुजली यासारख्या समस्या होत नाहीत.

डोळ्यांसाठी फायदेशीर : कडूलिंबाचे पाणी डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असते. रोज कडूलिंबाचे पाणी पिण्यामुळे डोळ्यांचा थकवा, खाज आणि वेदना कमी होतात.

इम्यून सिस्टम बुस्ट करतो : कडुलिंबा मध्ये एंटी-बैक्टीरियल आणि एंटी-फंगल गुण असतात यामुळे कडुलिंबाचे पाणी सेवन केल्याने इम्यून सिस्टम बुस्ट होते आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.

तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी : ओरल हाइजीनसाठी पण कडूलिंबाचे पाणी उपयोगी आहे. कडूलिंबाचे पाणी लाळेमध्ये (थुंकी मध्ये) एल्काइनचे स्तर वाढवते ज्यामुळे जीवाणू आणि संक्रमणचा धोका कमी होतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top