dharmik

घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी करा हे उपाय

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुखी राहण्याची इच्छा असते, त्याचे कुटुंब नेहमी आनंदात राहावे असे त्याला वाटते. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात आणि कुटुंबामध्ये नेहमी कोणत्याही गोष्टीची कमी राहू नये. पण तरीही अनेक प्रयत्न केल्यावर देखील व्यक्तीला निराशेचा सामना करावा लागतो. परंतु तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही.

आज आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि काही पारंपारिक उपाय केल्यामुळे तुम्हाला फायदा देखील होईल.

चला पाहू दरिद्रता दूर कण्याचे काही उपाय

जर तुम्ही दररोज नियमितपणे साखर किंवा पोळी मुंग्यांच्या बिळाच्या जवळ टाकली तर तुमची मोठ्यात मोठी समस्या दूर होईल. जर तुम्ही असे केले तर यामुळे राहू आपल्या पूर्ण शक्तीने तुमची मदत करेल आणि तुमचे मोठ्यात मोठे दुर्भाग्य देखील सौभाग्यात बदलून देईल.

जर एखाद्या व्यक्तीचा व्यापार व्यवस्थित चालत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये समस्या येत असतील तर यासाठी चार गोड पोळ्या बनवून त्यास व्यवस्थित देसी तूप लावून या पोळीला पिडीत व्यक्तीवरून उतरवून कोणत्याही भुकेल्या व्यक्तीस द्याव्यात. पोळी दिल्यानंतर तुम्ही त्या भुकेल्या व्यक्तीला 11 रुपये द्यावेत जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात त्वरित फायदा होईल.

जेव्हा दररोज तुम्ही भोजन करता तेव्हा एक पोळी सर्वात पहिले आपल्या पितरांच्या नावाने काढून ठेवावी आणि सकाळी कोणत्याही गायीला खाण्यास द्यावी या उपायाने वाईट दिवस दूर होण्यास सुरुवात होईल आणि तुमची धनाच्या संबंधीतील समस्या दूर होऊन धन सुख संपत्ती प्राप्त होईल.

तुम्ही महिन्याच्या पहिल्या बुधवारी रात्री कच्ची हळद गाठ बांधून भगवान कृष्णास अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी तिला पिवळ्या धाग्यात बांधून आपल्या उजव्या हातात बांधावी असे केल्याने तुम्हाला शुभ फल प्राप्त होतील.

जर तुम्ही आपल्या तिजोरी मध्ये 9 लक्ष्मीकारक कवड्या आणि एक तांब्याचा सिक्का ठेवला तर यामुळे तुमच्या तिजोरी मध्ये धनाची कमी कधी होणार नाही.

तुम्ही दररोज नियमित पणे केळ्याच्या झाडाला पाणी अर्पित केले आणि देसी तुपाचा दिवा लावला तर या उपायामुळे धनाची देवी माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल.

दर गुरुवारी तुळशीच्या रोपात्यास दुध अर्पण करा असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.


Tags
Show More

Related Articles

Back to top button