Connect with us

लागोपाठ 3 शुक्रवारी करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी

Dharmik

लागोपाठ 3 शुक्रवारी करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी

धनाची देवी माता लक्ष्मीला मानले जाते त्यामुळे मान्यता आहे कि लक्ष्मीची पूजा केल्याने दरिद्रता दूर होते आणि सुख-सौभाग्य प्राप्त होते. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे विशेष फलप्राप्त होते. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी राहते. खरतर हिंदू धर्मा मध्ये आठवड्याचे सात दिवस वेगवेगळ्या देवतांना समर्पित आहेत. सोमवार भगवान शंकराला, गुरुवार दत्त गुरूंना तर शुक्रवार लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही जर माता लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली पाहिजे.

यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष विधी सांगितलेली आहे जिच्या पालन केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या बद्दल माहिती देत आहोत.

शुक्रवारच्या दिवशी अशी करा माता लक्ष्मीची पूजा

शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान इत्यादी दैनिक कार्य झाल्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा सुरु करावी. यासाठी घरातील पूजेच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो समोर तुपाचा दिवा लावून बसावे आणि 108 वेळा लक्ष्मी मंत्र ॐ श्रीं श्रीये नम: जपावा. लक्षात ठेवा जप करताना तुमचे लक्ष पूजेच्या ठिकाणी केंद्रित असले पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीला खडीसाखर आणि खीर यांचा नैवेद्य द्यावे. यानंतर सात वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलींना घरी बोलवून भोजन द्यावे. भोजनाच्या सोबत मुलींना माता लक्ष्मीला दाखवलेला खडीसाखर आणि खिरीचा प्रसाद द्यावा. याप्रकारे पूर्ण विधिवत माता लक्ष्मीची पूजा लागोपाठ तीन शुक्रवार करावी. असे केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांच्या कृपेमुळे घरातील दारिद्य दूर होईल.

प्रत्येक शुक्रवारी असा लावा दिवा

याच प्रमाणे माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी दुसरी शास्त्रीय विधी देखील आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला एक दिवा लावावा लागेल. लक्षात ठेवा या दिव्यासाठी तेलाच्या एवजी गायीच्या तुपाचा वापर करावा आणि कापसाच्या वातीच्या एवजी लाल रंगाच्या सुती धाग्याचा वापर करावा. त्याच सोबत तुपा मध्ये थोडेसे केसर टाकावे. अश्या पद्धतीने प्रत्येक शुक्रवारी दिवा लावा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक तंगी दूर होते.

तिजोरी मध्ये ठेवा या वस्तू

माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अजून एक उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या घराच्या तिजोरी मध्ये एक पिवळ्या रंगाची लहान पिशवी (पोटली) ठेवावी लागेल त्यामध्ये पाच पिवळ्या कवड्या, थोडेसे केसर आणि एक चांदीचा सिका बांधून ठेवायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी असे केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल आणि धनाच्या संबंधित समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.

याच सोबत शुक्रवारच्या दिवशी गरिबांना दान देणे आणि त्यांना भोजन देणे यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याच सोबत तुम्ही शुक्रवारी गरिबाला पांढऱ्या रंगाची वस्तू दान देऊ शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Trending

Advertisement
To Top