moneyviral

एक्स्पर्ट म्हणतात, AC सुरु करताच स्मैल तर Alert रहा, या 6 गोष्टी फॉलो करणे आवश्यक

चेन्नई मध्ये एयर कंडीशनर (AC) मुळे तीन लोकांचा मृत्यू झालेला. पोलिसांच्या प्रमाणे वीज गेल्यानंतर यालोकांनी इन्व्हर्टर सुरु केला. आणि एसी चालू करून झोपले. रात्री वीज पुन्हा आली पण इन्व्हर्टर चालूच राहिला. याच दरम्यान एसी मधून गैस लीक झाला. रूम मधील कोणताही दरवाजा किंवा खिडकी उघडी नव्हती. त्यामुळे कदाचित लीक झालेल्या गैसमुळे गुदमरून यांचा मृत्यू झाला. याबद्दल एक्स्पर्ट सोबत चर्चा केल्यानंतर समजले कि एसी मध्ये असा कोणता गैस असतो जो आपला जीव घेऊ शकतो आणि हा कोणत्या परस्थितीत लीक होऊ शकतो.

असा कोणता गैस असतो एसी मध्ये

काही वर्षा पूर्वी पर्यंत जे एसी मार्केट मध्ये येत होते त्यामध्ये मुख्यतः क्लोरोफ्लोरो (CFC) गैस वापरला जात होता.

याच्या लीक होण्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग चा धोका वाढत होता सोबतच गैसचे अधिक प्रमाणात एक्सपोजर झाले आणि हे श्वासातून शरीरात गेले तर हृद्य गती अनियंत्रित करू शकते.

अनेक वेळा गाडी आणि घरा मध्ये एसी सुरु असताना गुदमरल्याने लोकांचा जीव गेला आहे, ते याच गैसच्या कारणाने गुदमरल्याने झाले आहे.

एसी मध्ये याचा वापर कुलिंग करण्यासाठी होतो.

हा गैस ओजोन कमी करू शकतो. यामुळे आता याचा वापर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.

गैस लीक का झाले?

पोलिसांच्या प्रमाणे एसी मध्ये खराबी होती. त्यामुळे गैस लीक झाला.

गैस लीक कसे ओळखावे?

एक्स्पर्ट सांगतात तीन ते चार वर्षापूर्वी जे एसी येत होते, त्यामध्ये क्लोरोफ्लोरो गैस वापरला जात होता. आता नवीन एसी मध्ये R32 गैस वापरला जातो.

हा गैस हलका आहे आणि जास्त धोकादायक देखील नाही.

जर गैस लीक होत असेल तर त्याचा वास (स्मैल) येण्यास सुरुवात होते. एसी सुरु करताच तो मंद मंद वास येण्यास सुरुवात होते. या स्मैल ला कधी दुर्लक्षित करू नका.

ज्या प्रमाणे गैस सिलेंडर लीक झाल्यावर स्मैल येते, त्याच पद्धतीने एसी चा गैस लीक झाल्यावर स्मैल येतो. असा स्मैल आल्यास त्वरित एक्स्पर्ट बोलावून दुरुस्ती केली पाहिजे.

कोणत्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक

वर्षातून कमीतकमी 3 वेळा एसी चा मेंटेनन्स करावा. दोन वेळा तर केलाच पाहिजे.

एसी साठी नेहमी ब्रांडेड केबल वापरली पाहिजे.

एसी साठी वेगळा पॉवर पोइंट लावा. दोन टन चा एसी असेल तर 16 एम्पियर चा पोइंट लावला पाहिजे. पॉवर अनुसार एम्पियर ची निवड करा.

नवीन एसी खरेदी करत असाल तर प्रयत्न करा सर्वात लेटेस्ट रेटिंग वाला एसी खरेदी करण्याचा. यामुळे विजेची देखील बचत होईल.

एसी च्या सर्विसिंग दरम्यान आतून आणि बाहेरून व्यवस्थित क्लिनिंग करून घ्या.

एसी सोबत वेगळा एमसीबी देखील लावू शकता. यामुळे विजेचा भार एसी वर येत नाही. विजेचा भार आल्यामुळे देखील शोर्ट सर्किट होऊ शकते. जे मोठ्या दुर्घटनेचे कारण बनू शकते.

पावर एक्सटेंशन कार्ड मध्ये एसी कधीही लावू नका.

इन्व्हर्टर सुरु असल्यास एसी चालवणे टाळावे. जर वापरत असा तर वीज पुन्हा आल्यावर इन्व्हर्टर बंद करण्यास विसरू नका.

एसी चा कोणताही पार्ट डैमेज झाला तर त्वरित रिपेयर करून घ्यावा.

एयर फिल्टर रेग्युलर चेंज करत राहावे.

नेहमी एखाद्या प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन कडून एसी रिपेयर करून घ्यावा. जर ऑफिशियल सर्विस सेंटर कडून एसी रिपेयर करून घेतल्यास उत्तम.


Show More

Related Articles

Back to top button