Xiaomi च्या नवीन Pad मध्ये 14 इंच OLED डिस्प्ले, मिळू शकते 120W फास्ट चार्जिंग, रॅम 24GB पर्यंत

Xiaomi लवकरच Pad 7 Max लाँच करू शकते. यात 14-इंच OLED डिस्प्ले, 120W फास्ट चार्जिंग, आणि 24GB रॅम पर्याय मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या फीचर्स!

On:
Follow Us

Xiaomi ने MWC 2025 मध्ये आपले नवीन टॅबलेट – Pad 7 आणि Pad 7 Pro लाँच केले होते. आता कंपनी या लाइनअपमध्ये आणखी एक नवीन टॅब लाँच करण्याच्या तयारीत आहे. लीक रिपोर्टनुसार, Xiaomi च्या या नवीन टॅबचे नाव Pad 7 Max असू शकते.

टिपस्टर Smart Pikachu च्या माहितीनुसार, कंपनी या टॅबमध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले देणार आहे. यापूर्वीच्या लीकमध्ये असे सांगण्यात आले होते की हा Pad 24GB रॅम पर्यंतच्या व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो आणि यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Xiaomi Pad 7 Max चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

सध्या Xiaomi च्या या अपकमिंग टॅबबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे टॅब Xiaomi Pad 6 Max चे अपग्रेडेड व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. यामुळे Pad 6 Max चे स्पेसिफिकेशन्स पाहता आपल्याला काही अंदाज बांधता येतो.

Xiaomi Pad 6 Max चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

हा टॅब 14-इंचाच्या 2.8K LCD पॅनेल सह येतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. कंपनी या डिव्हाइसमध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज पर्यंतचा पर्याय देते. प्रोसेसिंगसाठी यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिला आहे. 6.53mm स्लिम मेटल बॉडी असलेल्या या टॅबमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा आहे.

हा टॅब 10,000mAh बॅटरी सह येतो, जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. खास गोष्ट म्हणजे हा डिव्हाइस 33W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येतो. OS बाबत सांगायचे झाल्यास, हा टॅब Android 13 बेस्ड MIUI Pad 14 वर कार्यरत आहे. दमदार ऑडिओसाठी Dolby Atmos सपोर्टसह 8 स्पीकर सेटअप मिळतो. तसेच, टॅबचा कीबोर्ड डिटॅचेबल आहे आणि यात स्टायलस सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel