Vivo Y39 5G Launched: Vivo ने मलेशियामध्ये आपल्या नवीन Vivo Y39 5G स्मार्टफोनची शांतपणे घोषणा केली आहे. हा फोन स्लीक डिझाइन आणि अनेक उच्च-स्तरीय वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे.
कंपनीच्या मते, Vivo Y39 5G मध्ये पॉवर, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणाचा उत्तम मेळ पाहायला मिळतो. मोठी बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर यासारखी वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. चला तर मग जाणून घेऊया Vivo Y39 5G ची किंमत आणि फीचर्स…
Vivo Y39 5G चे स्पेसिफिकेशन्स
120Hz रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले:
Vivo Y39 5G चे वजन 205 ग्रॅम असून त्याचे डायमेंशन 165.7×76.3×8.09mm आहे. फोनमध्ये 6.68-इंच LCD डिस्प्ले आहे, जो 1608×720 रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सह येतो, ज्यामुळे स्मूथ व्हिज्युअल अनुभव मिळतो. यामध्ये अतिरिक्त सुरक्षेसाठी कॅपेसिटिव्ह साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग देखील दिली आहे.
8GB रॅम आणि 6500mAh बॅटरी
Vivo Y39 5G मध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आहे, जो 4nm प्रोसेस वर तयार करण्यात आला आहे. हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्यायासह सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग सहजतेने करता येते. कंपनीनुसार, हा फोन दिवसभर वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यात 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी आहे, जी केवळ 83 मिनिटांत 1% वरून 100% पर्यंत चार्ज होते. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 सह येतो, जो वापरकर्त्यांना उत्तम अनुभव देतो.
50MP प्रायमरी कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Vivo Y39 5G मध्ये f/1.8 अपर्चर असलेला 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP बोकेह कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, Wi-Fi, Bluetooth 5.1, NFC सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट यांसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे.
Vivo Y39 5G ची किंमत
Vivo Y39 5G दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – Ocean Blue आणि Galaxy Purple. मलेशियामध्ये, हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या सिंगल वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत MYR 1,099 (सुमारे 20,000 रुपये) आहे.