Vivo ने आपल्या होम मार्केट चीनमध्ये वाय (Y) 37 सिरीजचा विस्तार केला असून, याअंतर्गत नवीन मोबाईल Vivo Y37c लॉन्च करण्यात आला आहे. याआधी Vivo Y37 आणि Vivo Y37m हे मोबाईल्स गेल्या वर्षी सादर झाले होते. नवीन मोबाईलबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 6GB रॅम आणि इतर अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग, याच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Vivo Y37c चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: नवीन Vivo Y37c मोबाईलमध्ये 6.56-इंचाचा मोठा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आहे. हा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 570 निट्स पर्यंत ब्राइटनेस सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये ब्लू लाईट कमी करण्यासाठी आय प्रोटेक्शन फिचर देखील दिला आहे.
परफॉर्मन्स: हा डिव्हाइस Unisoc T7225 चिपसेट वर चालतो. यामध्ये 6GB LPDDR4x रॅम आणि 128GB eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच अतिरिक्त वर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळतो, ज्यामुळे मल्टीटास्किंगचा परफॉर्मन्स अधिक चांगला होतो.
कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo Y37c मध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. मागच्या बाजूला 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि LED फ्लॅश उपलब्ध आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 5,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे, जी 15W चार्जिंग सपोर्ट करते. ही मोठी बॅटरी वापरकर्त्यांना दीर्घकालीन बॅकअप देईल.
इतर फीचर्स: फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो जलद आणि सुरक्षित अनलॉकिंग अनुभव देतो. Vivo Y37c मध्ये ड्युअल सिम 4G सपोर्ट, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅकसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. हा फोन IP64 सर्टिफाइड असून, तो डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे.
सॉफ्टवेअर: Vivo Y37c मध्ये Android 14 आधारित OriginOS 4 दिले आहे, जे स्मूथ आणि कस्टमाईज्ड युजर एक्सपीरियन्स प्रदान करते.
डायमेंशन्स आणि वजन: या फोनचे डायमेंशन्स 167.30 x 76.95 x 8.19mm आहेत आणि याचे वजन सुमारे 199 ग्रॅम आहे, ज्यामुळे फोन हातात हलका आणि स्लिम जाणवतो.
Vivo Y37c ची किंमत
Vivo Y37c ची किंमत 1,199 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 14,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटसाठी आहे. सध्या हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन दोन रंगांमध्ये सादर झाला आहे – डार्क ग्रीन आणि टायटॅनियम.