Vivo ने मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. चीनमध्ये लॉन्च झालेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनचे नाव Vivo Y200+ आहे. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तीन आकर्षक रंग पर्यायांमध्ये – अॅप्रीकॉट सी, स्काय सिटी, आणि मिडनाईट ब्लॅक – हा फोन सादर करण्यात आला आहे.
चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 1099 युआन (अंदाजे ₹12,854) आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसारखे शानदार फीचर्स असलेला हा फोन खूपच चर्चेत आहे. चला तर मग, याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Vivo Y200+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या फोनमध्ये 720 x 1608 पिक्सल रिझॉल्यूशनसह 6.68-इंचाचा LCD डिस्प्ले ऑफर करते. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याचा पीक ब्राइटनेस 1000 निट्स आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीने Snapdragon 4 Gen 2 चा वापर केला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी कंपनीने 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की फोन फक्त 36 मिनिटांत 50% चार्ज होतो. हा फोन Funtouch OS वर चालतो आणि यात एआय कॉल इनहॅन्समेंटसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
फोन IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्ससह येतो. उत्कृष्ट साऊंड अनुभवासाठी फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स आहेत, जे 300% पर्यंत अल्ट्रा-हाय व्हॉल्यूम ऑफर करतात.