2025 च्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यासाठी किंवा जवळच्या व्यक्तीसाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर 6000mAh बॅटरीसह Vivo T3x 5G फोन तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
सध्या कंपनी या डिव्हाइसवर 2,500 रुपयांपर्यंत सवलत देत आहे. याशिवाय नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर यांसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. चला, या फोनवरील ऑफर, किंमत, वैशिष्ट्ये आणि सेलिंग प्लॅटफॉर्मविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Vivo T3x 5G ऑफर्स आणि किंमत
Vivo T3x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन व्हेरियंट्समध्ये लॉन्च झाला होता. सर्व व्हेरियंट्सवर 1,000 रुपयांची फ्लॅट डिस्काउंट आणि 1,500 रुपयांचा बँक ऑफर आहे, म्हणजे तुम्हाला एकूण 2,500 रुपयांची सवलत मिळू शकते.
- 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये
- 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये
लाँचवेळी या व्हेरियंट्सच्या किंमती अनुक्रमे 13,499 रुपये, 14,999 रुपये आणि 16,499 रुपये होत्या. बँक ऑफर क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या बहुतेक बँकांवर उपलब्ध आहे. जर तुम्ही नो-कॉस्ट EMI च्या माध्यमातून फोन खरेदी करू इच्छित असाल, तर कंपनीने 3 महिन्यांच्या सहज हप्त्यांचा पर्याय दिला आहे.
एक्सचेंज ऑफर
जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 9,500 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो, परंतु हा लाभ तुमच्या जुना फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. Vivo T3x 5G फोन दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – सेलेस्शियल ग्रीन आणि क्रिम्सन ब्लिस.
Vivo T3x 5G कुठे खरेदी कराल?
जर तुम्हाला आम्ही सांगितलेल्या ऑफर्ससह Vivo T3x 5G खरेदी करायचा असेल, तर हा फोन फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाइन शॉपिंग साइटवर उपलब्ध आहे.
Vivo T3x 5G चे वैशिष्ट्ये
डिस्प्ले: Vivo T3x 5G फोनमध्ये 6.72 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2408 x 1080 रिझोल्यूशन मिळते.
प्रोसेसर: या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 4nm प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात 2.2GHz क्लॉक स्पीडचा अनुभव मिळतो.
स्टोरेज आणि रॅम: फोन 4GB रॅम + 128GB, 6GB रॅम + 128GB आणि 8GB रॅम + 128GB अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. वर्च्युअल तंत्रज्ञानामुळे 16GB पर्यंत रॅमचा सपोर्ट मिळतो.
कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
बॅटरी: 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
ऑपरेटिंग सिस्टम: हा स्मार्टफोन Android 14 आधारित Fun Touch OS 14 वर चालतो.
इतर फीचर्स: Vivo T3x 5G मध्ये IP64 रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 4G, 5G, वाय-फाय आणि ब्लूटूथ यांसारखी फीचर्स आहेत.