Tecno कंपनीने भारतासह जागतिक बाजारात कमी किमतीतील स्मार्टफोनच्या माध्यमातून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच परंपरेत आता Tecno Spark 30C चा अपग्रेड मॉडेल म्हणून Tecno Spark 40C लवकरच सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, ही डिव्हाईस सध्या Geekbench या बेंचमार्किंग साइटवर स्पॉट (Spotted) झाली आहे, त्यामुळे लवकरच ती बाजारात झळकण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे, Tecno Pova 7 (4G) हा स्मार्टफोन FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसून आला असून तो देखील लवकरच लाँच केला जाऊ शकतो. चला तर मग, दोन्ही डिव्हाईसच्या लिस्टिंगबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Tecno Spark 40C – Geekbench लिस्टिंग डिटेल्स
Tecno चा हा आगामी स्मार्टफोन KM4k या मॉडेल नंबरसह Geekbench वर लिस्ट झाला आहे, जो Tecno Spark 40C असण्याची शक्यता आहे.
Geekbench लिस्टिंगनुसार या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर (Octa-core Processor) दिला जाऊ शकतो. यात दोन परफॉर्मन्स कोर (Performance Cores) 2GHz वर आणि सहा एफिशियंसी कोर (Efficiency Cores) 1.70GHz वर कार्यरत असतील. या SoC मध्ये Mali-G52 MC2 GPU देखील असण्याची शक्यता आहे.
वरील स्पेसिफिकेशन्सवरून असे वाटते की, Spark 40C मध्ये Helio G85 चिपसेट (Helio G85 Chipset) दिला जाऊ शकतो.
Geekbench लिस्टिंगनुसार डिव्हाईसमध्ये 4GB RAM असण्याची शक्यता असून, लाँचवेळी इतर व्हेरिएंट्सही समोर येऊ शकतात.
ऑपरेटिंग सिस्टमबाबत बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Android 15 सह सादर केला जाऊ शकतो.
याशिवाय, लिस्टिंगमध्ये इतर कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केलेला नाही.
Tecno Pova 7 – FCC लिस्टिंग डिटेल्स
Tecno चा आणखी एक स्मार्टफोन LJ6 मॉडेल नंबरसह FCC लिस्टिंगमध्ये आढळून आला आहे, जो Tecno Pova 7 (4G) असू शकतो.
या लिस्टिंगनुसार डिव्हाईसमध्ये Dual Band Wi-Fi, Bluetooth आणि NFC सपोर्ट दिला जाऊ शकतो. मात्र, या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी (5G Connectivity) उपलब्ध नसेल.
FCC लिस्टिंगमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, हा डिव्हाईस U450TSB Power Adapter सह येईल, जो 45W फास्ट चार्जिंग (45W Fast Charging) सपोर्ट करेल.
लिस्टिंग इमेजमध्ये Tecno Pova 7 चा रियर स्कीमॅटिक डिझाईन (Schematic Design) दाखवण्यात आला आहे, ज्यात त्रिकोणी-आकाराचा कॅमेरा आयलंड (Triangular-Shaped Camera Island) दिसतो. यामध्ये Dual Camera Setup आणि LED Flash असण्याची शक्यता आहे.
याशिवाय, स्कीमॅटिक इमेजवरून समजते की डिव्हाईसला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्यंत पर्याय मिळू शकतो.
FCC सर्टिफिकेशननुसार फोनचे डायमेंशन 163.2 x 74.4 x 9mm इतके असू शकते.
लवकरच होऊ शकतो लाँच
Tecno Spark 40C आणि Tecno Pova 7 (4G) या दोन्ही डिव्हाईसच्या लिस्टिंगवरून स्पष्ट होते की, कंपनी लवकरच हे स्मार्टफोन बाजारात आणू शकते. आता हे पाहणे रंजक ठरेल की, Tecno ब्रँड येत्या आठवड्यात किंवा महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा कधी करते.















