Infinix ने नुकतेच भारतीय बाजारात फ्लिप-स्टाइल फोल्डेबल फोन Infinix Zero Flip लाँच केला आहे. आता Tecno कंपनी भारतात बुक-स्टाइल फोल्डेबल फोन Tecno Phantom V Fold 2 सादर करण्याच्या तयारीत आहे.
Tecno ने एका एक्स पोस्टमधून टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये “A New Chapter Will Unfold Soon” असा उल्लेख आहे, जो Phantom V Fold 2 च्या भारतातील आगामी लाँचचा संकेत देतो. चला, Phantom V Fold 2 चे संपूर्ण फीचर्स जाणून घेऊया.
Tecno Phantom V Fold 2 लवकरच भारतात लॉन्च
गेल्या महिन्यात Tecno ने अफ्रिकेत Phantom V Fold 2 ची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीने साउथ ईस्ट एशिया, मिडल इस्ट आणि लॅटिन अमेरिका या बाजारातही हा फोन उपलब्ध होईल असे जाहीर केले होते.
जागतिक बाजारात या डिव्हाइसची किंमत $1,099 (सुमारे ₹92,400) ठेवण्यात आली होती. भारतात यापूर्वी Tecno Phantom V Fold लाँच झाला होता, ज्याची किंमत ₹88,888 होती. त्यामुळे या अपग्रेडेड मॉडेलची किंमतही याच आसपास असण्याची शक्यता आहे.
Tecno Phantom V Fold 2 5G चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले:
- 6.42-इंच AMOLED LTPO बाह्य डिस्प्ले (2550 x 1080 पिक्सल रिझोल्यूशन)
- 120Hz रिफ्रेश रेट आणि 2160Hz PWM डिमिंग
- 7.85-इंच फोल्डेबल AMOLED LTPO डिस्प्ले (2296 x 2000 पिक्सल रिझोल्यूशन)
- 120Hz रिफ्रेश रेट आणि 2160Hz PWM डिमिंग
प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर:
- MediaTek Dimensity 9000+ चिपसेट
- Android 14 आधारित HiOS 14 ऑपरेटिंग सिस्टम
- 2 वर्षांपर्यंत OS अपडेट्स आणि 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स
फिचर्स आणि कनेक्टिव्हिटी:
- फ्लिकर सेन्सर आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर
- ड्युअल स्पीकर्स आणि Phantom V Pen सपोर्ट
- Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, NFC, आणि USB Type-C पोर्ट
कॅमेरा सेटअप:
- मागील बाजूस तीन 50MP कॅमेरे: प्राइमरी, पोर्ट्रेट आणि अल्ट्रावाइड कॅमेरा
- सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी आणि स्टोरेज:
- 5,750mAh बॅटरी
- 70W अल्ट्रा फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट
- 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज
- फोनचा वजन: 249 ग्रॅम