टेक्नो लवकरच कॅमॉन 40 (Tecno Camon 40) सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कॅमॉन 40 सीरीज मिड-प्रीमियम श्रेणीत उपलब्ध होईल. यापूर्वी टेक्नो कॅमॉन 30 सीरीज गेल्या वर्षी भारतात लॉन्च झाली होती.
Tecno Camon 40 Premier ने अमेरिकेतील FCC सर्टिफिकेशन मिळवले आहे, तर Camon 40 4G थायलंडच्या NBTC वेबसाइटवर दिसला आहे. त्यामुळे या फोनचे जागतिक पातळीवर लॉन्च होणे निश्चित मानले जात आहे. याशिवाय, कॅमॉन 40 प्रो 4G आधीच FCC आणि TÜV Rheinland सर्टिफिकेशन साइटवर पाहण्यात आला आहे.
Tecno Camon 40 Premier आणि Camon 40 4G: डिझाईन (लीक माहिती)
कॅमॉन 40 प्रीमियरच्या (Camon 40 Premier) बाबतीत बोलायचे झाले, तर त्याचा मॉडेल क्रमांक CM8 आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये दोन सेंसर आणि एक पेरिस्कोप लेन्स आहे. बॅक पॅनलच्या डाव्या बाजूला वर्टिकल रेषा दिसते.
रेंडर्सनुसार, फोनच्या उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण आहेत, तर डाव्या बाजूला एक बटण आहे, ज्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. लिस्टिंगमध्ये असेही दिसते की कॅमॉन 40 प्रीमियर 5G NR, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, आणि NFC ला सपोर्ट करतो.
Tecno Camon 40 Premier आणि Camon 40 4G: फीचर्स (लीक माहिती)
टेक्नो कॅमॉन 40 सीरीजमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेजचा समावेश असेल. याशिवाय, हा फोन 512GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. 70W फास्ट चार्जिंगसाठी चार्जिंग अडॅप्टरसुद्धा उपलब्ध असेल.