TECNO CAMON 40 Series: MWC 2025, म्हणजेच मोबाइल वर्ल्ड काँग्रेस, लवकरच सुरू होणार आहे. हा इव्हेंट मोबाइल टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे जगभरातील मोठ्या टेक कंपन्या आपली नवीनतम तंत्रज्ञान उत्पादने सादर करतात.
प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड TECNO नेही अधिकृत घोषणा केली आहे की, तो MWC Barcelona 2025 मध्ये सहभागी होणार आहे आणि या इव्हेंटमध्ये Tecno CAMON 40 Series लाँच करणार आहे. या स्मार्टफोन सिरीजसोबतच कंपनी आपला AI लॅपटॉप MEGABOOK S14 आणि AI Glasses Series देखील सादर करणार आहे.
TECNO CAMON 40 Series हा इव्हेंट स्पेनच्या बार्सिलोना शहरात आयोजित केला जाणार आहे. 4 मार्च रोजी या स्मार्टफोन मालिकेचे अनावरण होईल, जिथे कंपनी त्यांच्या फोन्सचे मॉडेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स याविषयी अधिकृत माहिती जाहीर करेल. भारतातही याच दिवशी TECNO CAMON 40 Series अधिकृतपणे लॉन्च होण्याची शक्यता आहे.
सध्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी, लिक्सनुसार TECNO CAMON 40 5G, TECNO CAMON 40 Pro 5G आणि TECNO CAMON 40 Premier 5G हे तीन स्मार्टफोन या सिरीजमध्ये सादर होऊ शकतात. मात्र, कंपनी कडून अजून कोणते फोन उपलब्ध होतील याची निश्चित माहिती 4 मार्चला समजेल.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, TECNO CAMON 40 आणि 40 Pro 5G मध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे. तर Camon 40 Premier 5G मध्ये 6.74-इंच AMOLED कर्व्ड एज डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट असू शकतो.
प्रोसेसरच्या बाबतीत TECNO CAMON 40 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसेट मिळण्याची शक्यता आहे, तर Camon 40 Premier 5G मध्ये Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर असू शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन्स 12GB RAM पर्यंतच्या पर्यायासह बाजारात येऊ शकतात.
कॅमेरा सेटअपही दमदार असण्याची अपेक्षा आहे. TECNO CAMON 40 आणि 40 Pro 5G मध्ये 50MP OIS + 8MP अल्ट्रावाइड रियर कॅमेरा मिळू शकतो. तर Camon 40 Premier 5G मध्ये 50MP OIS + 50MP अल्ट्रावाइड + 50MP टेलीफोटो लेन्स असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी Camon 40 आणि 40 Pro 5G मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असेल, तर Premier 5G मध्ये 50MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.