Stuffcool ने भारतात नवीन Stuffcool Roam+ पॉवरबँक लॉन्च केला आहे. या पॉवरबँकमध्ये 20,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा पॉवरबँक कॉम्पॅक्ट साइजचा असला तरी त्याची बॅटरी क्षमता मोठी आहे. यामध्ये अनेक यूजर-फ्रेंडली फीचर्स देण्यात आले आहेत.
हा पॉवरबँक LED इंडिकेटर सह येतो आणि चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट सपोर्ट करतो. हा 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. चला तर मग जाणून घेऊया या पॉवरबँकची किंमत आणि वैशिष्ट्ये.
Stuffcool Roam+ Powerbank ची भारतातील किंमत
Stuffcool Roam+ पॉवरबँकची किंमत भारतात ₹1,799 ठेवण्यात आली आहे. हा पॉवरबँक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबत कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी देखील देते.
Stuffcool Roam+ Powerbank चे स्पेसिफिकेशन्स
Stuffcool Roam+ हा कॉम्पॅक्ट पॉवरबँक असून यात 20,000mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. हा पॉवरबँक पोर्टेबल असल्याने प्रवासात सहज नेता येतो. त्याच्या फ्रंट साइडला ट्रान्सपरंट केसिंग असून तो ग्लॉसी फिनिश सह येतो. या पॉवरबँकचे डायमेंशन 10.8 x 6.9 x 2.93cm आहेत आणि याचे वजन 322 ग्रॅम आहे.
या पॉवरबँकच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये LED इंडिकेटर देखील आहे, जो चार्जिंग स्टेटस दाखवतो. चार्जिंगसाठी यात USB Type-C PD पोर्ट देण्यात आला असून तो 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. याशिवाय यात 22.5W USB Type-A पोर्ट देखील आहे, जो 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो.
कंपनीच्या दाव्यानुसार, USB Type-C पोर्ट च्या मदतीने हा पॉवरबँक iPhone ला 30 मिनिटांत 50% चार्ज करू शकतो. इतकेच नव्हे, पॉवरबँक चार्ज करत असताना देखील तो डिव्हाइसेसला 18W स्पीडने चार्ज करू शकतो.