जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल आणि तुमची पसंती Sony च्या टीव्हीकडे असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. येथे आम्ही तुम्हाला Sony चे काही सर्वात परवडणारे LED Smart TV बद्दल माहिती देणार आहोत.
या Sony TV ची किंमत ₹30,000 पेक्षा कमी आहे. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट Display आणि दमदार Dolby Audio अनुभवता येणार आहे. हे टीव्ही तुम्ही Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. चला, या टीव्हींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sony BRAVIA 80 cm (32 inches) HD Ready Smart LED Google TV KD-32W835 (Black)
Amazon India वर Sony Bravia KD-32W835 टीव्ही ₹27,990 मध्ये उपलब्ध आहे. याच्या Features बाबत सांगायचे झाल्यास, यात तुम्हाला HD Ready Smart LED Display मिळतो. हा Display 60Hz Refresh Rate ला सपोर्ट करतो.
टीव्हीची Picture Quality सुधारण्यासाठी यात X-Reality PRO, MotionFlow XR 200, आणि HDR10/HLG टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Sound Quality सुधारण्यासाठी Sony या टीव्हीमध्ये Open Baffle Speaker सह 20W Sound Output आणि Dolby Audio Support देते.
Connectivity साठी यात 3 HDMI आणि 2 USB Ports देण्यात आले आहेत. हा टीव्ही 1 वर्षाच्या Warranty सह येतो.
SONY 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Google TV 2024 Edition (KD-32W825)
Flipkart वर Sony KD-32W825 टीव्ही ₹25,490 मध्ये उपलब्ध आहे. याच्या Features मध्ये 1366 x 768 Pixels Resolution सह HD Ready Display मिळतो. 60Hz Refresh Rate सपोर्ट करणारा हा टीव्ही X-Reality Pro आणि HDR टेक्नॉलॉजीसह येतो, ज्यामुळे याची Picture Quality अप्रतिम होते.
Sound System बाबत सांगायचे झाल्यास, यात Open Baffle Speaker देण्यात आला आहे, जो 20W Sound Output देतो. याशिवाय Dolby Audio Support देखील आहे, जो थिएटरसारखा अनुभव देतो.