Honor 200 Lite: स्मार्टफोन कंपन्यांसाठी भारत हा एक महत्त्वाचा बाजार आहे. भारतात दर महिन्याला अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. सप्टेंबर महिनाही स्मार्टफोनच्या बाबतीत खूपच धमाकेदार ठरला. iPhone 16 सीरीजसह अनेक प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आले. मात्र, हा सिलसिला इथंच थांबणार नाही. आता दिग्गज कंपनी Honor आणखी एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Honor लवकरच भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीचा आगामी फोन Honor 200 Lite असणार आहे. हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्ससह बाजारात सादर केला जाणार आहे. काही काळापासून या स्मार्टफोनबद्दल चर्चा सुरू होती, परंतु आता Honor कडून याची लाँचिंग डेट निश्चित करण्यात आली आहे.
लाँचिंगची तारीख
Honor 19 सप्टेंबर 2024 रोजी हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह बाजारात येणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने Amazon वर याची मायक्रोसाइट देखील लाइव्ह केली आहे.
Honor 200 Lite मिड-रेंज सेगमेंटमध्ये येऊ शकतो. त्यामुळे Samsung, Vivo, Oppo आणि Infinix यांना कडवी टक्कर मिळणार आहे. हा स्मार्टफोन Starry Blue, Cyan Lake आणि Midnight Black या रंगांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीने याच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
Honor 200 Lite चे फीचर्स
- ग्राहकांना 6.78 इंच मोठी स्क्रीन मिळणार आहे.
- यामध्ये AMOLED पॅनेल असेल, ज्यात 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- हा स्मार्टफोन Android 14 वर चालणार असून Magic OS 8.0 वर काम करेल.
- या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
- सेल्फीसाठी समोर 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.