सॅमसंग स्मार्टफोन युजर्सना अनेक सीक्रेट फीचर्सचा लाभ घेता येतो. येथे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी (Samsung Galaxy) फोन्समधील पाच हिडन फीचर्सची माहिती देत आहोत.
सॅमसंग गॅलेक्सी फोन्सचे पाच सीक्रेट फीचर्स
सॅमसंग ही जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर्सपैकी एक कंपनी आहे, आणि जगभरातील कोट्यवधी लोक सॅमसंग स्मार्टफोन्स वापरतात. सॅमसंग गॅलेक्सी लाइनअप हा सर्वात प्रीमियम अँड्रॉइड (Android) फोन्सपैकी एक आहे, ज्यामध्ये काही हिडन फीचर्स उपलब्ध आहेत. चला या फीचर्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
1. बिक्सबी टूल्स सूट (Bixby Tools Suite)
आज जरी युजर्सना Gemini AI सोबत अनेक AI फीचर्स मिळत असले तरीही सॅमसंग आपल्या बिक्सबी असिस्टंट (Bixby Assistant) च्या मदतीने युजर्सना खास टूल्स देत आहे. बिक्सबीद्वारे अॅप्स कंट्रोल करण्यापासून ते बॅटरी लाईफ ऑप्टिमाइज करण्यापर्यंत अनेक फायदे मिळतात.
2. एज पॅनल्स (Edge Panels)
सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्समध्ये एका बाजूने स्वाइप केल्यावर अॅप्स आणि सेटिंग्ज असलेला एक खास बार दिसतो. युजर्सला हा एज पॅनल कस्टमाइज करण्याचा पर्याय मिळतो आणि त्याद्वारे ते क्विक अॅक्सेस अॅप्स सहज वापरू शकतात. यात कम्पास (Compass) पासून नोटपॅडपर्यंत (Notepad) सर्वकाही ऍड करता येते.
3. गुड लॉक (Good Lock)
सॅमसंग गॅलेक्सीमध्ये गुड लॉक (Good Lock) अॅप डाउनलोड केल्यानंतर युजर्सना अनेक कस्टमायझेशन पर्याय मिळतात. विविध मॉड्यूल्सच्या मदतीने युजर्स होम स्क्रीन आणि लॉकस्क्रीन कस्टमाइज करू शकतात. शिवाय, फोनच्या रियर पॅनलवर टॅप करून अॅप्स लाँच करणे किंवा स्क्रीनशॉट घेणे शक्य होते. यामुळे युजर एक्सपीरियन्स अधिक चांगला होतो.
4. व्हिडिओ कॉल इफेक्ट्स (Video Call Effects)
सॅमसंगच्या अॅडव्हान्स्ड सेटिंग्ज सेक्शनमध्ये युजर्सना खास व्हिडिओ कॉल फीचर्स मिळतात. हे फीचर्स Google Meet, Zoom Meetings, किंवा WhatsApp व्हिडिओ कॉल्स दरम्यान वापरले जाऊ शकतात. यामध्ये बॅकग्राउंड ब्लर करणे किंवा बॅकग्राउंड एडिट करणे अशा गोष्टी करता येतात.
5. शेअर्ड अल्बम्स (Shared Albums)
सॅमसंग गॅलरी अॅपमध्ये शेअर्ड अल्बम फीचर उपलब्ध आहे. या फीचरद्वारे युजर्स एक अल्बम तयार करून इतरांसोबत शेअर करू शकतात. या अल्बममधील फोटोज इतर लोक पाहू शकतात, तसेच त्यामध्ये फोटोज ऍडसुद्धा करू शकतात.